बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला टिप्पर (एम.एच. ११ सीएच ३७२८) हा पावसामुळे रस्ता खचल्याने खाली उलटला त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात असलेल्या लोखंडी बारवर बसलेले १६ जण त्याखाली दबले गेले. Thirteen laborers returning from work on Samrudhi Highway were killed on the spot
विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा: बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला टिप्पर (एम.एच. ११ सीएच ३७२८) हा पावसामुळे रस्ता खचल्याने खाली उलटला त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात असलेल्या लोखंडी बारवर बसलेले १६ जण त्याखाली दबले गेले. त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज शुक्रवारी दुपारी तालुक्यातील तढेगाव फाटा (जि.बुलढाणा) मार्गावर घडली. वाचलेल्या तिघांमध्ये एका पाचवर्षीय मुलीचा समावेश आहे. हे सर्व मजूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते.
समृद्धी महामार्गाचे जवळपास सुरु असलेल्या साईटवरील काम पावसामुळे बंद पडल्याने तढेगाव येथील कॅम्पवर परतत होते, अशी प्राथमिक माहिती किनगावराजा पोलिसांनी दिली आहे. मजुरांची नावे कळू शकली नाहीत. मेहकर ते सिंदखेडराजा मार्गावरील खडकपूर्णा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने जड वाहतूक तढेगाव मार्गे देऊळगावमहीकडे वळविण्यात आली असल्याने ह्या मार्गावर रहदारी वाढली आहे.
घटनास्थळी अत्यंत करुण दृश्य होते. या मजुरांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची तयारी करण्यात येत आहे.
Thirteen laborers returning from work on Samrudhi Highway were killed on the spot
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही नाय सोडलं ,सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती ; अजित पवारांची विनोदात्मक फटकेबाजी
- पश्चिम बंगालमधील हिंसाचार लोकशाहीला कलंक, राज्यपाल जगदीप धनकर यांची टीका; हिंसा रोखण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्याचे आवाहन
- तुम्ही-आम्ही “कर्तव्यकठोर” म्हणत मुख्यमंत्र्यांची गडकरींवर टोलेबाजी; नागपूरच्या मेट्रोचे उद्घाटन
- राज्यात आजही मुसळधार पाऊस,उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट !