वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारतात येत्या ६ ते ८ आठवड्यांमध्ये कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिला वेळही लागू शकतो. पण सध्याचे निर्बंध उठवताच लोकांनी कोविड प्रोटोकॉल तोडून गर्दी करणे हे अधिक गंभीर आहे आणि त्यामुळे तिसऱ्या लाटेला थांबवणे अशक्य होईल, असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. Third Wave “Inevitable, Could Hit India In 6 To 8 Weeks”: AIIMS Chief Dr Randeep Guleria
तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्याबरोबरच डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लोकांच्या वर्तणूकीवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, देशातील मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करून अधिकाधिक लोकांना कोरोनापासून सुरक्षित करणे हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे. पण निर्बंध शिथिल होताच लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. लोक अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून मास्क वापरत नाहीयेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. लोक ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे वागत आहेत त्यातून लोक पहिल्या आणि दुसर्या लाटेतून काहीच शिकले नाहीत हेच दुर्देवाने दिसून येत आहे.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे योग्य निर्णय आहे. कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवले जाऊ शकते. पण अनलॉक होताच पुन्हा गर्दी वाढल्याचा परिणाम चांगला होणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास थोडा वेळ लागेल. पुढील तिसरी लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत येऊ शकते किंवा त्यास थोडा जास्त वेळ लागू शकेल, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले
Third Wave “Inevitable, Could Hit India In 6 To 8 Weeks”: AIIMS Chief Dr Randeep Guleria
महत्त्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi Birthday : 51 वर्षांचे झाले राहुल गांधी, ‘सेवा दिवस’ च्या रूपात काँग्रेस साजरा करणार वाढदिवस
- शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी व्हीसीद्वारे संवाद
- लडाखमध्ये भारताची सैन्यक्षमता गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी अधिक, ती कमी करणार नाही; हवाई दल प्रमुख आर. के. सिंग भदौरियांचे सूचक वक्तव्य
- लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो ! ; पुणे-मुंबईच्या पर्यटकांचा बंदीमुळे हिरमोड
- प्रकृती खालावल्याने चोक्सीला डॉमिनिकाच्या रुग्णालयात ठेवणार