• Download App
    आर्थिक तंगीतही समृद्दीचा विचार करा|Think of prosperity even in financial hardship

    मनी मॅटर्स : आर्थिक तंगीतही समृद्दीचा विचार करा

    तुम्ही मनाने किंवा विचाराने किती श्रीमंत आहात हे देखील फार महत्वाचे असते. प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असाल, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे असे तिचे ठाम मत आहे.Think of prosperity even in financial hardship

    आपण जेव्हा तंगीत किंवा संकटात असतो त्यावेळी पैशांची उणीव किंवा तुटवडा या विषयी विचार करण्यापेक्षा आपण समृद्ध झालो तर काय काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. खरेत तर ते सोप काम नाही. पण प्रयत्न केल्यास अगदी अशक्यदेखील नाही. अशा वेळी समृद्धीचा विचार करा. त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा.

    आपले एक छोटे पाउलदेकील कदाचित आपल्याला मोठ्या यसाकडे, समृद्धीकड नेवू शकते याची आदी मनाशी खात्री बाळगली पिजे. ती कात्री जर ठेवली तर पैसे मिळणे तितकेसे कठीण जात नाही. म्हणजेच आपल्या हातून काम घडते आणि त्याचा परिणाम पैश्यांच्या प्राप्तीवर सुद्धा होतो. अजून एक गोष्ट म्हणजे पैसा किंवा तुम्हाला कोणतीही आवश्यक वाटेल ती बाब मिळण्याचा एक शार्ट कट म्हणजे आनंदीत रहा. सुख अनुभवा. मनासारख्या वस्तू वा पैसा जीवनात आणण्यासाठीचा मार्गच हा आहे.

    तुम्ही आनंद आणि सुख या भावना तुमच्या आसपास पसरवा म्हणजे त्याच तुमच्याकडेही आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यात पैसा आणि सुख आणतील. तुमचे आंतरीक विचार सर समृध्द , सुविचार असतील तर तशीच तुमचीही भरभराट होईल हे नक्की. त्यामुळे तुम्ही जर सकारात्मक विचार कला तर पैसे तुमच्याकडे आपसुख यतील. आत्ता नाही तरी किमान भविष्यात तरी ते नक्की यतील याची खात्री बाळगलीच पाहिजे.

    Think of prosperity even in financial hardship

    Related posts

    ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!