• Download App
    पुण्यात चोरांचा उच्छाद, 70 वर्षीय महिलेचा खून करून लाखोंचे दागिने लंपासThieves rage in Pune, murder 70-year-old woman

    पुण्यात चोरांचा उच्छाद, ७० वर्षीय महिलेचा खून करून लाखोंचे दागिने लंपास

    सिंहगड रोड रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेचा खून करून घरामधून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. Thieves rage in Pune, murder 70-year-old woman


    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  सिंहगड रोड रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेचा खून करून घरामधून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

    शालीनी बबन सोनावणे (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या मुलाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा हिंगणे खुर्द परिसरात राहतो. त्यांची आई शालीनी या देखील त्यांचे समोरील सोसायटीत एकट्या राहत होत्या. शनिवारी रात्री घरी आल्यानंतर सोनवणे रात्री साडे नऊ वाजता आईकडे गेले.

    त्यावेळी त्यांना आई हॉलमध्ये पडल्याची दिसून आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी घरातून पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

    शालीनी यांच्या गळ्यात ४ ते ५ तोळे सोने होते.ते तसेच होते. त्याला हात लावला गेला नाही. कपाटात रोकड व इतर दागिने देखील होते, तेही तसेच आहेत. त्यामुळे हा खून जवळच्या कोणी केला आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत.

    Thieves rage in Pune, murder 70-year-old woman

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…