दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनात देशविघातक शक्ती घुसल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. आंदोलनातील डाव्या संघटनांच्या महिला ‘हाय हाय मोदी मर जा तू’ असे म्हणत आहेत. हे भारतीय शेतकरी असूच शकत नाहीत, अशी टीका आता होऊ लागली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनात देशविघातक शक्ती घुसल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. आंदोलनातील डाव्या संघटनांच्या महिला ‘हाय हाय मोदी मर जा तू’ असे म्हणत आहेत. हे भारतीय शेतकरी असूच शकत नाहीत, अशी टीका आता होऊ लागली आहे. There can be no Indian farmers chanting ‘Modi Mar Ja Tu’
शेतकरी आंदोलनातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला ‘मोदी मर जा तू’, असे म्हणताना दिसत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाचे विळा-हातोडा हे चिन्ह असलेले पोस्टर आहे. हे आंदोलक राजस्थानातील घडसाना भागातील आहेत.
दिल्ली भारतीय जनता पक्षाचे महासचिव कुलजीतसिंह चहल यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना म्हटले आहे की हे माझ्या देशातील शेतकरी असूच शकत नाही. त्यांना हे करण्यासाठी कोण स्पॉन्सर करत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
यापूर्वी माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांनीही भडकाविणारे भाषण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकटे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे आव्हान दिले होते. त्याचबरोबर एका पंजाबी चॅनलशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीला पाठिंबा दिला होता.
There can be no Indian farmers chanting ‘Modi Mar Ja Tu’
यापूर्वी एका व्हिडीओमध्ये असे म्हटले होते की ज्या प्रकारे इंदिरा गांधी यांना ठाकेले तसेच नरेंद्र मोदींनाही ठोकू. याच ठिकाणी एक आंदोलक जय हिंद बोलण्याला विरोध करत होता. विशेष म्हणजे त्यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान उपस्थित होते. हा आंदोलन म्हणत होता की ‘जय हिंद’ही म्हणणार नाही आणि भारत माता की जय असेही म्हणणार नाही. फक्त ‘जो बोले सो निहाल’ हिच घोषणा दिली जाईल.