• Download App
    च्युइंगम खाण्याचे देखील होतात अनेक फायदे|There are several benefits to eating chewing gum

    विज्ञानाची गुपिते : च्युइंगम खाण्याचे देखील होतात अनेक फायदे

    च्युइंगम या खाण्याच्या नव्हे तर चघळण्याच्या पदार्थाबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असली तरी एका ठरावीक वयात च्युइंगम चघळत एखादे काम करणे, मैदानी खेळ खेळणे अनेक जणांना आवडत असते. या च्युइंगमचा आणि मेंदूचा काही संबंध असेल असे आतापर्यंत कोणालाच वाटले नव्हते. मात्र चघळण्याच्या या क्रियेमुळे तुमची विचारशक्ती सुधारते व तुम्ही आणखी सतर्क होता असे नव्या संशोधनातून पुढे आले आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती च्युइंगम चघळत असते There are several benefits to eating chewing gum

    त्यावेळी तिचा प्रतिसादाचा वेग दहा टक्क्यांनी वाढतो आणि मेंदूच्या आठ वेगवेगळ्या भागांवर या क्रियेचा परिणाम होतो. चघळण्याच्या क्रियेमुळे उत्तेजना वाढते व मेंदूकडील रक्तप्रवाहात तात्पुरती सुधारणा होते. या अभ्यासाकरता संशोधकांनी च्युइंगम चघळणाऱ्या व न चघळणाऱ्या गटांची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी जो च्युइंगम वापरला त्याला कोणत्याही प्रकारचा सुगंध किंवा गोड चव नव्हती. त्या गोड चवीमुळे ते विचलित होऊ नये या दृष्टीने ही व्यवस्था केली होती.

    या पाहणीत पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूचे स्कॅनिंग करून हे निरीक्षण करण्यात आले. तीस मिनिटांच्या या चाचणीत सहभागी झालेल्या प्रतिसादकर्त्यांना त्यांच्या समोर दिसणाऱ्या स्क्रीनवरील बाणाच्या दिशेनुसार उजव्या किंवा डाव्या अंगठ्ने बटण दाबण्यास सांगण्यात आले. या चाचण्यांच्या निष्कर्षात असे दिसून आले की च्युइंगम न चघळणाऱ्या स्त्री-पुरुषांनी दिलेल्या प्रतिसादाचा कालावधी 545 मिलिसेकंदाचा होता तर च्युइंगम चघळणाऱ्यांनी त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे 493 मिलिसेकंदात प्रतिसाद नोंदवला.

    हालचालीमुळे आणि लक्ष देण्याची क्रिया घडत असल्यामुळे मेंदूतील भाग अधिक सक्रिय झाल्याचे स्कॅनिंगमध्ये दिसून आले. चघळण्याच्या क्रियेमुळे असा परिणाम कसा काय होतो हे अद्याप सिद्ध झाले नसले तरी त्याबाबतही काही सिद्धांत आहेत. च्युइंगमचा एक तुकडा वीस मिनिटे चघळल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ झाली व त्यामुळे अधिक ऑक्सिजनचा व पोषक द्रव्यांचा पुरवठा मेंदूला झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. दुसऱ्या सिद्धांतानुसार चघळण्याच्या क्रियेतून जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते. अशा प्रकारे च्युइंगम चघळण्याचा वेगळा फायदाही आहे.

    There are several benefits to eating chewing gum

    Related posts

    ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!