Information Is Key To Success असं नेहमी म्हटलं जातं. यामुळे या डिजिटल युगात सर्व महत्त्वाची माहिती आपल्याजवळ असावी अशीच प्रत्येकाची धारणा आहे. डिजिटल युगात माहितीचा प्रचंड मारा प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये सुरू असतो. पण यात खरं काय, खोटं काय यावरून वाचकांचा गोंधळ उडत असतो. पण आता असे होणार नाही, TheFocusIndiaने फेक न्यूजचा बुरखा फाडण्याची आणि वाचकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या याच प्रयत्नांची पोचपावती म्हणून अल्पावधीतच वाचकांनी आम्हाला उदंड प्रतिसादही दिला आहे. thefocusindia five crore readers completed
दि. २१ मे २०२१ रोजी आम्ही पहिल्यांदाच १ कोटी वाचकांचा टप्पा पार केला होता. आणि अल्पावधीतच १ सप्टेंबर २०२१ रोजी आम्ही तब्बल २ कोटी वाचकांचा टप्पा पार केला होता. आता १४ मार्च २०२३ रोजी आम्ही तब्बल ५ कोटी वाचकांचा टप्पा पार केला आहे . हे फक्त पेज व्यूज नाहीत, तर आमच्या कंटेंटवर वाचकांनी दाखवलेला सार्थ विश्वास आहे, असे आम्ही मानतो.
https://youtube.com/shorts/K5as0LWtX6Y?feature=share
आजपर्यंत हजारोंच्या संख्येने माध्यमांची संकेतस्थळे सुरू झाली परंतु सातत्याअभावी बंदही पडली आहेत. अशा या कठीण काळात ‘द फोकस इंडिया’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर अल्पावधीतच मोठे यश मिळवले आहे. ऑनलाइन माध्यमांत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा आम्ही तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या बळावर पार केला आहे. यामुळे ही आनंद तुमच्यासोबत साजरा करणे स्वाभाविकच आहे.
वाचक देवो भव:
विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करणे, हेच अलीकडे माध्यमांचे काम झाले आहे. त्यामुळेच समोर आलेली प्रत्येक बातमी वस्तुनिष्ठ असेलच याची वाचकाला खात्री होत नाही. इथेच ‘द फोकस इंडिया’ने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘द फोकस इंडिया’मध्ये फेक न्यूज नसतील. परंतु मुख्य प्रवाहातील माध्यमांनी जाणते-अजाणतेपणे दुर्लक्ष केलेले खरे पैलू, वस्तुनिष्ठ विश्लेषण, सकारात्मक बातम्यांचा आवर्जून समावेश आहे. यामुळेच तर इतर माध्यमांच्या तुलनेत गुणवत्तेच्या आधारावर ‘द फोकस इंडिया’ हे उजवे ठरले आहे. पाच कोटी व्ह्यूजचा टप्पा हेच वाचकांचे प्रेम दर्शवतो. वाचक देवो भव: अशी आमची भावना आहे. याच भावनेतून वाचकांचा प्रतिसाद, प्रतिक्रियांनाही आम्ही तेवढेच महत्त्व देतो. रास्त तक्रारींचे नेहमीच खुल्या मनाने स्वागतही करू. यापुढेही आम्ही वाचकांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरू, हा आमचा विश्वास आहे. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार. वाचत राहा thefocusindia.com!
thefocusindia five crore readers completed
महत्वाच्या बातम्या
- जुनी पेन्शन बंद करणारे काँग्रेस – राष्ट्रवादी हेच कर्तेधर्ते; आणि आज तेच दुटप्पी आंदोलनकर्ते!!
- जुनी आणि नवी पेन्शन योजना??; कोणी लागू केली आणि नेमका फरक काय??
- महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत रंगणार; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय
- काँग्रेसच्या तब्बल चार मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख राहिलेले संघ प्रचारक श्रीपाद सहस्त्रभोजने कालवश!!