• Download App
    जॉर्डनमध्ये सापडले ११ हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले धान्य कोठार The world's first granary was discovered in Jordan 11,000 years ago

    जॉर्डनमध्ये सापडले ११ हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले धान्य कोठार

    माणसाचे पूर्वज सुरुवातीला शिकार करुन तसेच रानावनात कंदमुळे गोळा करुन गुजराण करीत. याच गवतांच्या जातीमध्ये बदल करुन त्याची लागवड शक्य आहे असे काही जणांच्या ध्यानात आले. त्यांनी सुपिक जमिनीवर लागवड करून धान्याचे उत्पादन सुरु केले. त्यामुळे जगण्यासाठी तसेच अन्नासाठीची वणवण कमी झाली. या शेतीभोवती ही माणसे वस्ती करुन राहू लागली. ते शेती करु लागली. त्यामुळे शेतीतून पिकणाऱ्या धान्याची साठवणूक करण्याची गरज निर्माण झाली त्यातूनच धान्याच्या कोठाराचा जन्म झाला. The world’s first granary was discovered in Jordan 11,000 years ago

    मात्र जगातील सर्वांत पहिले धान्य कोठार कोठे बांधले गेले आणि कधी बांधले गेले याची उत्सुकता लागून राहिली. पुरातत्वशास्त्रज्ञांनी याचा सखोल अभ्यास करुन काही निष्कर्ष आता मांडले आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार जार्डनमध्ये खोदकाम करीत असताना त्यांना या पुरातन धान्य कोठाराचा शोध लागला

    . टायग्रिस व यफ्राटिस नद्यांच्या खोऱ्यात जगातील पहिल्या संस्कृतीची मुहुर्तमेढ रोवली गेली यावर आता सर्व वैज्ञानिकांचे एकमत आहे. हे कोठार ११,००० वर्षे जुने असल्याचेही वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. मानवाने साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरुवात केली. म्हणजेच मानवाने शेती उत्पादन सुरु करण्यापूर्वीच त्याची साठवणूक करण्याची सोय केली होती. या कोठारात गहू व बार्ली चांगल्या स्थितीत सापडली. त्यामुळे कोठाराची रचना किती चांगल्या प्रकारे करण्यात आली होती हे स्पष्ट होते. माणसाने मातीची भांडी सुरु करण्याच्या आधिची हे कोठार आहे.

    त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व तर आहेच पण मानवाची अन्न साठवून ठेवण्याची वृत्ती किती पूर्नीपासूनची आहे हे देखील या संशोधनावरुन नेमकेपणाने लक्षात येते. रानावनातून कंदमुळे खातानाच त्याला शेती करायची कल्पना सुचली व त्यातूनच पुढे त्याने धान्य साठविण्यासही प्राधान्य दिले.

    The world’s first granary was discovered in Jordan 11,000 years ago

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!