प्रतिनिधी
यवतमाळ : मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात महापुरामुळे आणि प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ठाकरे – पवार सरकार म्हणते, पंचनामे करून नुकसानभरपाई देऊ. परंतु पाऊस थांबून आठवडा झाला तरी अजून पंचनाम्यात कुठे होताना दिसत नाहीत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री विरोध आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारला घेरले.The Thackeray Pawar government was surrounded by Fadnavis
त्यांनी निळापूर येथे पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी आज भेट देऊन पाहणी केली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की कापूस आणि सोयाबीनचे अतिशय चांगले पीक असताना संपूर्ण नुकसान झाले आहे. कापसाची बोंड पूर्णतः काळी पडली आहेत. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे विशेष मदत शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने केली पाहिजे. गेल्या २ वर्षांपासून सातत्याने काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येत आहेत. त्यामुळे तातडीने आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे.
आमच्या काळात पीक विमा आणि नुकसानीची अशी दोन्ही प्रकारची मदत मिळत होती. आता मात्र केवळ घोषणा आणि आदेश निघतात. पण कोणतीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सरकार म्हणते पंचनामे झाले की मदत करू, पण पंचनामे होतानाही कुठे दिसत नाही, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली.
The Thackeray Pawar government was surrounded by Fadnavis