• Download App
    The Sun was born 4.6 billion years ago, before Jupiter

    सूर्याचा जन्म ४.६ अब्ज वर्षांपूर्वी, आधी आला गुरु ग्रह

    सूर्याचा जन्म ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाला. तोपर्यंत सूर्याभोवती एकही ग्रह तयार झाला नव्हता. फक्त वायू, धूळ आणि छोट्या-मोठ्या तुकड्यांची चकती त्याभोवती फिरत होती. या वायूच्या चकतीतूनच प्रथम गुरू ग्रहाने आकार घ्यायला सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. गुरुत्वाकर्षणामुळे छोटे छोटे तुकडे, वायू आणि धूळ एकत्र येत ग्रहांनी आकार घ्यायला सुरुवात केली. सूर्यमालेतील ग्रहांच्या आजच्या स्थितीतून शास्त्रज्ञ तेव्हाच्या निर्मितीचे आडाखे बांधत आहेत. The Sun was born 4.6 billion years ago, before Jupiter

    हे म्हणजे अपघातानंतर मोटारीच्या अवस्थेवरून अपघात कसा झाला, याचा अंदाज बांधण्यासारखे आहे. सुरुवातीच्या काळात शनी ग्रह सूर्याला दोन प्रदक्षिणा घालत असेल, तर त्याच कालावधीत गुरू ग्रह तीन प्रदक्षिणा घालत होता, असा सिद्धांत आजवर मांडला जात होता. परंतु सुर्यमालेची आजची स्थिती पाहता, नवीन सिम्युलेशनने हा सिद्धांत खोडून काढला आहे.

    गुरू ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या दोन प्रदक्षिणांच्या कालावधीत शनी एक प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे नवीन सिद्धांत सांगतो. गुरू आणि शनीच्या भ्रमणाच्या या गतीमुळेच पृथ्वीसारख्या स्थायी रूपातील आंतरग्रहांची निर्मिती झाल्याचे स्पष्ट होते. तसेच, युरेनेस आणि नेपच्यून या ग्रहांची आजची स्थिती कूपर बेल्टच्या वस्तूमानामुळे निश्चिीत झाल्याचेही नवा सिद्धांत सांगतो. सुरुवातीच्या कालावधीत सूर्यमालेच्या शेवटच्या भागात म्हणजेच नेपच्यूननंतर बर्फाच्छादित बटू ग्रह आणि प्लॅनोटॉइड्‌स होते.

    प्लुटो ग्रह हा त्याचाच भाग असल्याची शक्यहताही हा नवा सिद्धांत वर्तवतो. सूर्यमाला निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हे अनावश्यजक छोटे ग्रह बाहेर फेकले गेले होते. सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह ही सूर्यमालेची रचना निश्चि तच अद्भुत आहे. या रचनेचा प्रवास उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनी सहा हजार गणितीय सिम्युलेशन्सचा अभ्यास केला. त्यानंतर आजच्या वास्तवाशी जवळ जाणारा नवीन सिद्धांत त्यांनी मांडला.

    यामुळे निश्चि तच गुरू आणि शनीच्या निर्मितीचा ठावठिकाणा लागला असून, त्याचबरोबर आपली सूर्यमालेची अभियांत्रिकी किती भिन्न आणि दुर्मीळ आहे, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या आजच्या अस्तित्वाचा शोध शास्त्रज्ञ नवनव्या साधनांद्वारे घेतच राहणार आहेत. त्यातील एक टप्पा या शोधाच्या रूपाने पूर्ण झाला आहे.

    The Sun was born 4.6 billion years ago, before Jupiter

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!