वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी पूर्वीची अपॉईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केली जाणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (ता. 16) स्पष्ट केले. The second dose of Covishield is now after 84 days, Changes in the Co-Win portal; Previous appointment valid
लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळणार नाही. 13 मे रोजी केंद्राने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील कालावधी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे को-विनमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरले होते.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या नवीन बदलाची माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये बदल केले आहेत.
को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अॅपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस मिळणार आहे. अपॉईंटमेंट वैध राहणार आहे. परंतु पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसरा डोस 84 दिवसांनंतर घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लस वापरण्यात येत आहेत.
The second dose of Covishield is now after 84 days, Changes in the Co-Win portal; Previous appointment valid
महत्त्वाच्या बातम्या
- पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई
- WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या
- वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या नव्या उद्योगांना उत्तर प्रदेशात २५ टक्के सबसिडी
- योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्के, मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक करत महाराष्ट्रात यूपी मॉडेल राबविण्याच्या केल्या सूचना