विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना नियमावलीमुळे उत्तर भारतीय समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमांत स्पष्टता आणावी , अशी मागणी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी केली आहे. The rules of corona should be clarified
दीहाडी मजूर, रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले, हे सर्व मुंबईच्या अर्थचक्रात महत्वाची भूमिका बजावतात. आज ते सर्व गावाकडे चालले गेले आहेत. आणि या कोरोनाच्या कन्फ्युजिंग नियमावलीमुळे त्यांना परत येता येत नाही.
माझी महाविकास आघाडी सरकारकडे मागणी आहे की या कोरोनाच्या नियमावलीत स्पष्टता आणावी जेणेकरून हे सर्व परत मुंबईमध्ये येऊ शकतील आणि आपले उद्योगधंदे स्थापित करून मुंबईच्या अर्थचक्राला गतिमान करण्याची आपली एक भूमिका निभावतील.
- कोरोनाच्या नियमावली स्पष्टता आणावी
- स्थलांतरित मजुरांत नियमामुळे संभ्रम
- मुंबईच्या अर्थचक्रात मजुरांचे मोठे योगदान
- मजूर, रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले गावाकडे
- महाराष्ट्रात त्यांना येण्यासाठी नियमात स्पष्टता हवी