वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर आज पहाटे साडेसहा वाजता दरोडा घालून ५७ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अवघ्या अडीच तासांत अटक केली. The robbers were arrested in just two and a half hours; 29 mobile phones stolen in Goa seized
पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकूण ५ आरोपीना अटक करण्यात आली असून दरोड्यातील रक्कम ५७ हजार सह मोबाईल व कार मिळून सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दरोड्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात नाकाबंदी करत अलर्टचा आदेश दिला होता. त्यानुसार वैभववाडी पोलिस निरिक्षक अतुल जाधव हे स्वतः सहकारी पोलिसांसह करूळ चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची कसून झडती घेत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दरोड्यातील संशयित कार ( MH -04 – KF – 2748 ) वैभववाडीत संभाजी चौकात आली. न थांबता सुसाट कोल्हापूरच्या दिशेने पळाली.
मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करत कारला करूळ चेकपोस्ट येथे गाठून पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल रजाक, मीर बादशहा शेख, सोहेल युनूस काझी, प्रमोद प्रकाश गायकवाड, चालक राजेश गुणाजी मासवकर अशी पाचही आरोपींची नावे आहेत. ते घाटकोपरहुन भाड्याच्या कारने ३१ डिसेंबरला गोव्याला गेले होते. गोव्यात २९ मोबाईल हातोहात लांबवले.
ओरोसला सिद्धी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने आले. पंपाच्या मॅनेजरने ठेवलेली हिशोबाची ५७ हजार रुपये अब्दुल रजाकने लंपास केले आणि कारसह सर्वांनी पोबारा केला. दरोड्याची घटना पोलिसांना समजताच एसपी दाभाडे यांनी लागलीच जिल्ह्यात नाकाबंदी केली. आणि दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या अडीच तासांत दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
- दरोडेखोरांना अवघ्या अडीच तासात मुसक्या
- पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
- वैभववाडी पोलिस पथकाची कामगिरी
- दरोड्यातील ५७ हजार रुपये जप्त
- गोव्यात चोरलेले५ लाखाचे २९ मोबाईलही जप्त
- सुमारे ९ लाखांचा मुद्देमालही केला जप्त
The robbers were arrested in just two and a half hours; 29 mobile phones stolen in Goa seized