• Download App
    तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका, परंतु परिणाम कमी, निती आयोगाची दिलासादायक माहिती The risk of infection in children in the third wave, but the consequences are low, is reassuring information from the Policy Commission

    तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका, परंतु परिणाम कमी, निती आयोगाची दिलासादायक माहिती

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असून त्यामध्ये लहान मुलांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक दिलासादायक माहिती दिली असून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसगार्चा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल. The risk of infection in children in the third wave, but the consequences are low, is reassuring information from the Policy Commission


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असून त्यामध्ये लहान मुलांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक दिलासादायक माहिती दिली असून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसगार्चा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल.

    पॉल यांनी शनिवारी सांगितलं की, जर लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्यात कोणतेही लक्षणं नसतील किंवा साधारण लक्षणं असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.



    भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरु आहेत. कारण, कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉईंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. भारतामधील विविध राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कमी-अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल.

    साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. मात्र, कोरोनाच्या विषाणुंमध्ये होणारे म्युटेशन पाहता असा ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते.

    The risk of infection in children in the third wave, but the consequences are low, is reassuring information from the Policy Commission

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…