• Download App
    कोरोनाविरुध्दच्या लढ्याचे जिल्हाधिकारी सेनापती, पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद The Prime Minister interacted with the District Collector of Maharashtra in the fight against Corona

    कोरोनाविरुध्दच्या लढ्याचे जिल्हाधिकारी सेनापती, पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

    कोरोनाविरध्दच्या लढाईत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी आपल्याला रोखायची आहे. मास्क, शारीरिक अंतरआणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लसीची एकही मात्रा वाया जाऊ देणे म्हणजे एक जीवन धोक्यात घालणे आहे असेही त्यांनी सांगितले The Prime Minister interacted with the District Collector of Maharashtra in the fight against Corona


    प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाविरध्दच्या लढाईत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी आपल्याला रोखायची आहे. मास्क, शारीरिक अंतरआणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

    पंतप्रधानांची कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे मंत्रालयातून सहभागी झाले होते.

    कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल उध्दव ठाकरे यांनी आभार मानले. अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची माहिती दिली. लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजना सांगितल्या.



    पंतप्रधान म्हणाले, कोरोनाने आपल्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी नवीन रणनिती आखून उपाययोजना करायला हव्यात. गेल्या काही दिवसात देशात सक्रिय रुग्ण कमी होण्यास सुरवात झाली आहे. परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्त्वात असेपर्यंत आव्हान कायम आहे.

    महामारी विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, त्यांनी केलेल्या कामाची व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. सर्व स्तरावर राज्ये व विविध संस्थांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे. स्थानिक अनुभव आणि देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. संख्या कमी होत असली तरीही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी धोरणे आखून ग्रामीण भाग कोरोनामुक्त करणे आवश्यक आहे.
    पंतप्रधान म्हणाले, विषाणू उत्परिवर्तन (म्युटंट)आणि स्वरूप बदलत आहे.

    आता हा विषाणू तरुण आणि मुलांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. यासाठी लसीकरण मोहीमेवर भर द्यायला हवा. लस वाया जाऊ देऊ नये. लसीच्या एकाही मात्रेचा अपव्य म्हणजे एक जीवन आहे. कोरोनातून लोकांचे प्राण वाचवितानो जीवनमान सुलभ करण्यालाही प्राधान्य द्यायला हवे. गरीबांना मोफत शिधाची सुविधा पुरवावी, इतर आवश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत आणि काळाबाजार थांबवायला हवा.

    केंद्रीय आरोग्य सचिव इतर देशांशी तुलनात्मक आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे 10 हजार लोकसंख्येमागे 12 डॉक्टर आहेत तर युरोपियन देशांमध्ये 30- 35 आहेत. त्यामुळे आपल्यापुढील आव्हान मोठे आहे.

    The Prime Minister interacted with the District Collector of Maharashtra in the fight against Corona

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट