प्रतिनिधी
मुंबई : पेंग्विन जन्मला ग सखे ,पेंग्विन जन्मला.. अशी गोड बातमी देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पेंग्विन संगोपनासाठी काढलेले टेंडर मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. The penguin was born; Penguin born in Mumbai ..Sweet News from kishori pednekar
वीर माता जिजाबाई उद्यानातील पेंग्विनच्या टेंडर वरून आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत.१५ कोटींच टेंडर ३ वर्षासाठी आहे, असे सांगताना पेडणेकर म्हणाल्या, १०% वाढ करून टेंडर आले आहे. कोर्टाने देखील कौतुक केले आहे. बाहेरून आलेले पक्षी आहेत , त्यांच्यावर खर्च होतोय, तो होणारच असे त्या म्हणाल्या. पेंग्विन येण्यापूर्वी प्राणी संग्रहलयाच उत्पन्न ७० लाख होते. २०२० चे उत्पन्न ५ कोटी ६७ लाख झाले आहे.
टेंडरवर चर्चा करण्यापेक्षा एक गुड न्यूज आहे. पेंग्विनच्या दोन जोड्या आहेत. डोनाल्ड आणि देसीला ओरिओ नावाच बाळ झाले आहे. आता तो मोठा झाला. किशोर वयातील आवरण एक वर्षापर्यंत राहील , मग तो प्रौढ होईल. पण तेव्हा बबल नावाची एकच मादी एकटी होती.आता ही बबल ओरिओला सांभाळतेय. मोल आणि प्लिपर या पेंग्विन जोडीला देखील एक बाळ झाले आहे.
सुरुवातीला ८ पेंग्विन होते. ३ नर आणि ४ मादी होते , आता आता एक बाळ झाले त्यामुळे ९ पेंग्विन आहेत, असे त्या म्हणाल्या.
- पेंग्विन जन्मला ग सखे, मुंबईत पेंग्विन जन्मला..
- महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून गोड बातमी
- १५ कोटींच टेंडर ३ वर्षासाठी आहे, मागे घेणार नाही
- १०% वाढ करून टेंडर आले, कोर्टाने कौतुक केले
- पेंग्विन येण्यापूर्वी उत्पन्न ७० लाख होते.
- २०२० चे उत्पन्न ५ कोटी ६७ लाख झाले आहे.
- बाहेरून आलेले पक्षी असल्याने खर्च होणारच
- खर्च होतोय तर होऊ दे, त्याची तमा नसल्याचा सूर