• Download App
    घुबडाला रात्री दीलही स्पष्ट कसे काय दिसते|The owl looks clear even at night

    विज्ञानाची गुपिते : घुबडाला रात्री दीलही स्पष्ट कसे काय दिसते

    बघता क्षणी थोडी भिती वाटावी असा पक्षी म्हणून घुबडाचा उल्लेख करावा लागेल. साधारणपणे पक्ष्यांची कधी भिती वाटत नाही. मात्र घुबड हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. त्याच्या भेदक नजरेमुळेच आपण खरे तर त्याला घाबरतो. खरे पाहता घुबडाने कोणावर हल्ला केल्याचे सहसा कानावर येत नाही. घुबड हा खरे तर निशाचर पक्षी आहे. जंगलात बहुतांश पक्षी संध्याकाळ झाली की झोपतात. घुबड त्याला अपवाद आहे. तो रात्री तर झोपत नाहीतच तर शिकारदेखील करतो. त्याची शिकार म्हणजे छोटे प्राणी, कीटक यापुरतीच मर्यादित असते.The owl looks clear even at night

    काही घुबडे माशांचीही शिकार करतात. घुबडांचे डोळे माणसाप्रमाणेच डोक्याच्या समोरच्या बाजूनला दोन्ही कडे असतात. त्याच्या डोळ्यांची नजरदेखील माणसाप्रमाणेच त्रमिती असते. त्यामुळे घुबडाला लांबी, रुंदीशिवाय खोलीचादेखील अंदाज जास्त चांगला येतो. पण आपल्यासारखे त्याला डोळे फिरवता येत नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर टाकायची असल्यास त्याला आपली मान फिरवावी लागते. दोन्ही बाजूंना धरुन संपूर्ण परिघात त्याची मान फिरते. त्यामुळे त्याला जवळजवळ पाठीमागचेदेखील पाहता येते.

    घुबडाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला दूरच स्पष्ट दिसते मात्र जवळचे थोडे धुसर दिसते. त्याची भेदक नजर भक्ष्यावर पडली की त्याचे काही खरे नसते. टक लावून तो भक्ष्यावर रोखून पाहतो. त्यातही तो गळ्यातून विचित्र आवाजही काढतो. त्यामुळे त्याच्याविषयी सहसा कोणाला प्रेम दिसत नाही. घुबडाच्या डोळ्याच्या खोबणीभोवती पिसांचे वर्तुळ असते. त्याचा आकार बदलण्याची कला घुबडाजवळ असते. त्याचे कान म्हणजे दोन भोकेच असतात. त्यावरुन घुबड भक्ष्याचा अंदाज बांधते. मादी घुबड एकाचवेळी अंडी घालत नाही.

    त्यामुळे त्यांच्यातून बाहेर पडणारी पिल्ले वेगवेगळ्या वयाची असतात. तसेच झाडांच्या ढोलीत किंवा रिकाम्या बिळात घुबडे अंडी घालतात. खरे पाहता अन्य पक्षी अंडी घालण्यासाटी सुरक्षित जागी चांगले तुलनेने मजबुत घरटे बांधत असतात. मात्र घुबड आयत्या जागी अंडी घालते. तेथेच त्यांची पिल्ले लहानाची मोठी होतात.

    The owl looks clear even at night

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!