• Download App
    भल्याभल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवणारा जादुई फिरकीचा धनी...!! The master of the magic spinner who dances the best batsmen on the pitch shane warne

    Shane Warne : भल्याभल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवणारा जादुई फिरकीचा धनी…!!

    शेन वॉर्न याच्या अचानक निधनामुळे केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतालाच नव्हे, तर संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट विश्वाला जबरदस्त धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या जादुई फिरकीचे गारुड केवळ फलंदाजांनाच नाचवायचे असे नाही, तर जगभराच्या करोडो करोडो क्रिकेटप्रेमींना या गारुडाने आपल्या प्रेमात पाडले होते…!!The master of the magic spinner who dances the best batsmen on the pitch shane warne

    शेन वॉर्नचा स्टार्ट अवघ्या काही पावलांचा. तो पाळायचा देखील नाही. पण जेव्हा त्याच्या बोटातून तो चेंडू निसटायचा… तेव्हा मात्र समोरच्या निष्णात फलंदाजांची सुद्धा भंबेरी उडालेली असायची… चेंडू नेमका कोणत्या अँगलने आणि कसा पडेल याचा अंदाज येण्यापूर्वी फलंदाजांची दांडी उडालेली असायची… सचिन, सेहवाग यांच्यासारख्या मास्टर्सना देखील त्याच्यापुढे खेळताना दहा-दहा विचार करायला लागायचा. अंदाज आला नाही की ते चक्क झेलबाद अथवा त्रिफळाबाद होऊन जायचे…!! आणि पॅव्हेलियनमध्ये जाऊन “तो” चेंडू आपण कसा खेळायला हवा होता, याचा विचार करत बसायचे…!!

    शेन वॉर्नच्या बोटातली जादूच अशी होती, की चेंडू आपल्या हुकमतीनुसार वळवण्याची त्याची क्षमता अफाट होती. काटकोनात चेंडू वळवणे हे भल्या भल्या फिरकी गोलंदाजांना जमले नव्हते, ते शेन वॉर्नला लीलया जमायचे आणि त्यामुळेच जगातला तो “सर्वात अवघड” गोलंदाज आहे, असे सचिन म्हणाला होता…!! सचिन सारखाच फलंदाज, जो खरंच मूळातच प्रतिभावंत आहे, तोच शेन वॉर्नपुढे टिकायचा. बाकी मी मी म्हणणाऱ्या फलंदाजांना तो हा हा म्हणता पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा.

    – बेदी, चंद्रा, प्रसन्ना

    वास्तविक फिरकी गोलंदाजी हा भारतीयांचा प्रांत… एकेकाळी चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना, व्यंकट राघवन या चौकडीने एकेकाळी क्रिकेट जगावर राज्य केले होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी नेहमी जलदगती तोफखान्याने भरलेली… त्यामुळे तिथे फिरकीची अशी “मुळी” उगवेल आणि ती एवढी प्रतिभावंत निघेल, असे स्वप्नातही कुणी पाहिले नव्हते…!!

    शेन वॉर्नच्या 18 वर्षाच्या कारकिर्दीची आकडेवारी अनेकांना सांगता येईल. पण शेन वॉर्नचे क्रिकेटमधले कर्तृत्व त्या पलिकडचे आणि प्रतिभाही पलिकडची होती. आकडेवारीच्या हिशेबात अनेक फिरकीपटू त्याच्यापुढे गेले, पण त्याची प्रतिभा सगळ्यांनाच साध्य झाली असे म्हणणे थोडे अवघड आहे.

    शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि अनिल कुंबळे हे आपल्या बोटांवर फलंदाजांना नाचवतात, असे सुनील गावस्कर म्हणायचा ते खरेच होते. सुनील गावस्कर या तीन गोलंदाजांमध्ये “चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना” बघायचा…!!

    आज शेन वॉर्नच्या अचानक धक्कादायक जाण्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला फिरकी गोलंदाजीचे पडलेले एक महान स्वप्न काळाने क्रिकेट जगतातून हिरावून नेले आहे…!!

    The master of the magic spinner who dances the best batsmen on the pitch shane warne

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??