- दिग्दर्शक विनोद कापडी बनविणार “गुजरात फाईल्स” सिनेमा!!
“द काश्मीर फाईल्स” या सिनेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे स्तुती केली काय आणि अनेकांच्या बुडाला जणू आगच लागली. आपल्या इकोसिस्टिमच्या आधारे आधी छुपेपणाने विरोध करणारे “जमियत ए पुरोगामी”च्या अनेक म्होरक्यांना मोदींच्या निमित्ताने उघडपणे पुढे येण्याची संधीच मिळाली. the kashmir files : vinod kapri to make a film on gujrat files, he dares pm modi
गुजरात फाईल्सचे सत्य
असाच “जमियत ए पुरोगामी” दिग्दर्शक विनोद कापडी आता पुढे आला आहे आणि त्याने “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाला खुन्नस म्हणून आपण “गुजरात फाईल्स” सिनेमा बनविणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. इतकेच नाही, तर हे जाहीर करणाऱ्या ट्विटमध्ये विनोद कापडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून “गुजरात फाईल्स” सिनेमात तुमच्याही भूमिकेचे “सत्य” मी जगासमोर मांडणार आहे, असे जाहीर केले आहे…!!
“गुजरात फाईल्स” सिनेमा बनविण्याचा मनसूबा जाहीर करणारे पहिले ट्विट विनोद कापडी यांनी करताच त्यांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला आणि आपले काही निर्मात्यांशी बोलणे झाले आहे. ते “गुजरात फाईल्स” सिनेमा बनवायला पैसा गुंतवायला तयार आहेत. मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून ते “गुजरात फाईल्स” हा सिनेमा प्रदर्शित करू देतील का…??, असा सवाल विनोद कापडी यांनी फार मोठा तीर मारल्याचे त्यांना वाटले आहे…!!
“गुजरात फाईल्स” कोणाच्या पथ्यावर…??
… पण इथेच नेमकी जमियत ए पुरोगामी फसली आहे आणि मोदींच्या जाळ्यात अडकली आहे. प्रश्न फक्त गुजरात फाईल्स बनविण्याचा नाहीए. असले सिनेमे बॉलिवूडमध्ये आधी बनलेच आहेत. तेच ते मोदी बोलले आहेत. पण आता विनोद कापडी यांनी “गुजरात फाईल्स” हा सिनेमा बनविला तर त्या सिनेमाच्या प्रदर्शनाचे “टायमिंग” काय असेल…?? गुजरातच्या निवडणूकीचेच ना…!! कारण गुजरातची निवडणूक २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात आहे. विनोद कापडी यांनी “गुजरात फाईल्स” सिनेमा अगदी तातडीने बनवून जरी प्रदर्शित केला, तरी तो मे – जून महिन्यांत प्रदर्शित होत नाही. त्याला किमान सप्टेंबर – ऑक्टोबर तरी उजाडेल. मग गुजरात फाईल्स सिनेमाच्या प्रदर्शनाचे (त्यात कितीही सत्य मांडले तरी) टायमिंग नेमके कोणाच्या पथ्यावर पडेल…?? मोदींच्याच ना…!!
“गुजरात फाईल्स”च्या निमित्ताने पुन्हा गोधरापासून ते दंग्यांपर्यंतच्या सर्व विषयांची चर्चा होईल. उजळणी होईल. समाजात ध्रुवीकरण होईल आणि ते कोणाच्या पथ्यावर पडेल…?? एवढे साधे समजत नाही…??
प्रदर्शनाला उशीर केला तरी…!!
बरं “गुजरात फाईल्स” हा सिनेमा विनोद कापडी यांनी थोडा लांबविला. तो केव्हा तरी २०२३ मध्ये प्रदर्शित केला, तरी काय फरक पडेल…?? वर्षभरातच लोकसभेच्या निवडणूका आहेत. तेव्हा विनोद कापडी कोणता नॅरेटिव्ह सेट करतील…?? त्यातून मोदींना किंवा भाजपच्या इकोसिस्टिमला काय फरक पडेल…?? “गुजरात फाईल्स”च्या “सत्याचा” भारतीय जनतेवर काय परिणाम होईल…?? आणि त्याचा मोदींवर काय परिणाम साध्य करता येईल…?? याचा विचार विनोद कापडी आणि “जमियत ए पुरोगामी”ने केला आहे…??
पडसाद कोणत्या समाजात…??
“द काश्मीर फाईल्स” जोरात चालला आहे. त्याचे परिणाम आणि पडसाद देशा – परदेशात उमटले आहेत. अगदी त्याची कॉपी मारून विनोद कापडींनी “गुजरात फाईल्स” काढला तरी त्याचे परिणाम आणि पडसाद कोणत्या समाजात उमटतील… आणि त्याचे प्रतिपडसाद कोणत्या समाजात उमटतील…? “जमियत ए पुरोगामी”ने काही विचार केला आहे…??
जमियत ए पुरोगामी Genuine नाही
या सगळ्याच प्रकाराला मी मोदींचे जाळे म्हणतोय… तुम्ही कुठूनही कसेही त्यात घुसण्याचा प्रयत्न करा… एकदा घुसलात की अडकलात आणि त्यातून पराभव झाल्याखेरीज सुटकेचा मार्ग नाही…!! याचा अर्थ असा नाही की मोदींना विरोध करू नये किंवा मोदीच जाळे पसरण्यात अजिंक्य आहेत…!! अजिबात तसे नाही. मोदी अजिंक्य नाहीत…!! पण “जमियत ए पुरोगामी” Genuine नाही. त्यांचे हेतू चांगले नाहीत किंवा फक्त एकाच दिशेने जाणारे आहेत… ते म्हणजे मोदींचा पराभव… पण तो कसा कारायचा… याची निश्चित योजना त्यांच्याकडे नाही.
घिसीपीटी धर्मनिरपेक्ष रेकॉर्ड
“जमियत ए पुरोगामी” मांडत असलेले मुद्दे सर्वसामान्य हिंदू समाजाला पटणारे नाहीत. हिजाबसारख्या मुद्द्यावर “जमियत ए पुरोगामी” जेव्हा धर्मांध मुसलमानांची बाजू घेते, तेव्हा त्यात पुरोगामीत्व नाही, हे हिंदू समाज ओळखतो. “जमियत ए पुरोगामी”चे “सिलेक्टिव्ह सत्य” किंवा सत्यावरची त्यांची “मालकी” ही सामान्य हिंदू समाजाच्या लक्षात आली आहे. धर्मनिरपेक्षतेचे एकतर्फी ढोल ऐकून हिंदू समाज कंटाळला आहे. हे “जमियत ए पुरोगामीला” ओळखता आलेले नाही. किंवा ओळखले असले तरी त्यांना मनातून ते मान्य नाही. म्हणून ते जुनीच नेहरू धर्मनिरपेक्षतेची घिसीपीटी रेकॉर्ड वाजवत बसले आहेत म्हणून त्यांच्यात मोदींचा पराभव करण्याची क्षमता नाही, हा खरा कळीचा मुद्दा आहे…!!
खुन्नस निघेल पण हेतू साध्य होईल…?
त्यामुळे “द काश्मीर फाईल्स”ला खुन्नस म्हणून “गुजरात फाईल्स” हा सिनेमा काढायला हरकत नाही. तो चालेलही जोरात. बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरेल…!! पण प्रश्न त्या पलिकडचा आहे, ज्या हेतूने विनोद कापडींना “गुजरात फाईल्स” सिनेमा काढायचा आहे, तो हेतू साध्य होणार आहे का…??
the kashmir files : vinod kapri to make a film on gujrat files, he dares pm modi
महत्त्वाच्या बातम्या
- हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न