प्रतिनिधी
पणजी : विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची हृदयद्रावक कहाणी यात सांगण्यात आली आहे.THE KASHMIR FILES: ‘The Kashmir Files’ to have maximum screenings in Goa: Pramod Sawant
या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हा चित्रपट (Movie) आवडला. मोदींनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मोदींनंतर आता प्रमोद सावंत यांनी देखील ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.
याबाबत ट्वीट करत सावंत लिहितात, ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखविण्यासाठी मी आयनॉक्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. काश्मीरी हिंदूंनी सोसलेल्या यातना, दुःख, संघर्ष सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे.
द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे पोस्टर लावले नसल्याचे कारण पुढे करून मडगाव येथील आयनॉक्स थिएटरच्या कर्मचाऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याची घटना घडली असून यासंबंधी 45 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.याच दरम्यान, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखू नका अशी सूचना खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयनॉक्स व्यवस्थापनाला केल्याने या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.
यासंबंधी आयनॉक्सचे व्यवस्थापक जोजफ परेरा यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर 45 अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेकायदा जमाव जमवून थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला.
‘द काश्मीर फाइल्सचे’ निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फोटो (Photo) शेअर करत लिहिले- ‘मला खूप आनंद होत आहे की अभिषेकने सत्य दाखवण्याचे धाडस केले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी USA मधील #TheKashmirFiles चे स्क्रीनिंग फायदेशीर ठरले.