- हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं असं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे .
- गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासाठी खास ….
काश्मिरी पंडित आणि महाराष्ट्र याचं एक वेगळं नातं आहे, हे नातं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालं …THE KASHMIR FILES: 1995 – Balasaheb’s state – where Kashmiri Pandits got reservation in education! 2022 – Thackeray Pawar government hates Kashmiri pundits – cinema of those who had to come and go during independence .. Home Minister read this
माधवी अग्रवाल
संभाजीनगर
ऐस गच्चे पाकिस्तान , बताव रोस ते बातनेव सान” ….आम्हाला काश्मीर पाहिजे- पंडित पुरुषांशिवाय, पण पंडित महिलांसह….
पाच हजार वर्षांपासून काश्मीर खोऱ्याचे रहिवासी – हिंदू सारस्वत ब्राम्हण ….ते आहेत कश्मिरी पंडित…THE KASHMIR FILES
द काश्मीर फाईल्स चित्रपटाने अख्खा देश हेलावला आहे .काश्मीरी पंडितांची व्यथा त्यांचं उध्वस्त आयुष्य त्यांच्या वेदना या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत .हा सिनेमा कुठल्याही खोट्या दाव्यांवर बनलेला नाही तर हे ज्वलंत सत्य आहे जे कधीच समोर येऊ दिले नाही .त्या काश्मीरी पंडितांच्या व्यथा स्वतः पाहिल्यावरच कळतील .त्या यातना ज्यांनी भोगल्या ते सारे आज विवेक अग्निहोत्री यांना देव समजत आहेत .कारण फक्त आणि फक्त त्यांनीच हे सत्य पडद्यावर मांडण्याची हिंमत दाखविली आहे .सिनेमा संपल्यावर अनेकांनी दिग्दर्शकाचे पाय धरले तर काहींना जागेवरून उठणे देखील कठीण झाले आहे .कुणी ढसा ढसा रडतंय तर कुणी भरभरून आशीर्वाद देतयं…
मात्र ठाकरे पवार सरकारला हा सिनेमा आणि कश्मिरी पंडितांच्या व्यथा म्हणजे केवळ स्वातंत्र्यानंतर एकदम तिकडे ये जा करणाऱ्यांची कथा वाटतेय . तसं गृहमंत्री वळसे पटलांनी आज बोलूनही दाखवलं.त्यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री मात्र मुग गिळून गप्प आहेत नेहमीप्रमाणेच…
काय म्हणाले गृहमंत्री ??
देशातील अनेक राज्यांमध्ये द काश्मिर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रानं देखील हा चित्रपट टॅक्स फ्री करावा. अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर वळसे पाटील म्हणतात …
काश्मीर फाईल्स हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्य़ाच्यात स्वातंत्र्याच्या दरम्यान इकडून तिकडे ज्यांचे येणे जाणे झाले त्यांना दाखवण्यात आले आहे. एका वेगळ्या विषयावर आधारित त्याची मांडणी आहे. . मी पाहिलेला नाही. मी ऐकीव माहितीवर सांगतो.. आज मला हे सांगायचे आहे की, हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं. हा प्रकार आहे. असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
तुम्ही पाहिलेला नाही म्हणता वरतून हिंदू भडकवत आहेत असेही म्हणता . ऐकीव गोष्टींवर विश्वास आहे मात्र ज्या पक्षाचा आज मुख्यमंत्री आहे त्या पक्षाचे सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पंडितांच्या वेदना समजून त्यांना मदत केली महाराष्ट्र त्यांना मदत करणारे पाहिलं राज्य होतं हे ही तुम्ही विसरलात .की तुम्हाला हे माहितीच नव्हते …मग ऐकलं तरी असेल ना …(नाही तुम्ही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवता म्हणून विचारले ….)
असो तर मुद्दा हा आहे की हे असे का ? सेक्युलॅरिझम च्या नावाखाली काहीही खपवून घेणारा महाराष्ट्र असेल पण भारत नाही अन् हिंदुस्तान तर नाहीच नाही …..
आताशी कुठं या मोदी बाबांनी देशप्रेम शिकवलं नाहीतर आम्ही बसलो होतो पडद्यावर झाडा मागं पळणारे हिरो हिरोईन ….एखादा खान … एखादं लव (जिहाद)…फार तर फार आमची मजल कुठपर्यंत गेली तर टिपू सुलतान अन् गांधी नेहरूंची वाह वा करण्यापर्यंत …अहो असे सिनेमे येताय असे सिनेमे बनवण्याचे धाडस होतंय …अशा सिनेमांवर बंदी नाही येत हीच मोठी गोष्ट आहे हाच बदल आहे . कळुद्या ना सत्य काय आहे येऊ द्या ना ते भारतीयांसमोर …असाल तुम्ही दाऊदचे फॅन पण आम्ही पण भक्त आहोत …
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आज जे वक्तव्य केलंय त्यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की ठाकरे पवार सरकारच्या संवेदना मेल्या आहेत . बाळासाहेबांचं स्वप्न होतं म्हणे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा… पण तो असा??????
हिंदुह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे मात्र आता ही सेना हिंदुत्वच विसरली ….ही सेना विसरली की आपण ज्या पक्षांना सोबत घेऊन सत्त्ता स्थापन केलीय ते पक्ष फक्त एका विशिष्ट समुदायासाठी किंबहुना विशिष्ट समुदायाच्या मतांसाठी राजकारण करतात …
काश्मिरी पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार आणि रातोरात घर सोडायची आलेली वेळ याच्या अनेक भयानक, दर्दनाक कहाण्या आहेत, ज्या आताच्या पिढीला फारशा माहीतही नाहीत.
काय आहे बाळासाहेबांचं काश्मीरी पंडितांच्या सोबतच खास नातं ??
19 जानेवारी 1990 काश्मिरी पंडित यांच्यासाठी एक काळ रात्र ठरली. काश्मीर मधील कट्टरवादी मुस्लिमांनी बंदुकीच्या जोरावर अल्पसंख्याक काश्मिरी ब्राह्मण पंडितांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितले, लाखों काश्मिरी पंडित बेघर झाले. त्यांनी कमावलेली संपत्ती,जमीन सर्व काही सोडून जाण्यास सांगितले. त्यांच्या कित्येक पिढ्यांनी अगदी मेहनत आणि बुद्धीमत्ता यांच्या जोरावर कमावलेले सर्वकाही सोडून जाण्यास सांगितले.
त्यांची जमीन आणि घर इतर कोणी विकत घेऊ नये असे आदेश देखील देण्यात आले होते. जो इधर कमाया वह इधर ही रहेगा असे आदेश काढण्यात आले. कट्टरवादी पंडितांना लुटत होते. त्यामुळे एका रात्रीत काश्मिरी पंडितांसमोर दारिद्रयात आयुष्य जगण्याची वेळ आली होती. सरकारने देखील एक कॅम्प उभा केला पंडितांची तात्पुरती राहण्याची सोय झाली पण पुढे काय? हा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यांच्या पोटापाण्याचा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहिला.
अशा वेळी काश्मिरी पंडिता समोर एकच नाव समोर आलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे.पत्रकार राहुल पंडित यांनी काश्मिरी पंडित यांच्याविषयी सविस्तर अभ्यास केला आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदती विषयी सांगतात. काश्मिरी पंडितांचा एक ग्रुप बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेला. बाळासाहेब याआधी अनेकदा पंडितांच्या प्रश्ननाबद्दल मोठ्या आपुलकीने बोलले होते.
पंडितांचे योग्य रीतीने पुनर्वसन व्हावे यासाठी ते आग्रही होते. बाळासाहेब दाखवत असलेल्या याच सहानभूतीमुळे
काश्मिरी पंडित यांच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब ठाकरे यांना एक विनंती केली ती अशी,महाराष्ट्र उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये काश्मिरी पंडितांना आरक्षण द्यावे. त्यावेळी राज्यांमध्ये सेनेची सत्ता होती. बाळासाहेब यांनी लगेच मनोहर जोशी यांना सांगून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले.
१९९५
काश्मिरी पंडितांना आरक्षण देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. त्याच बरोबर त्या शिष्टमंडळाला असं देखील सांगितलं की महाराष्ट्र नेहमी तुमच्या सोबत मागे खंबीर उभा असेल.
जम्मूमध्ये ज्या शाळा होत्या त्या इतक्या चांगल्या दर्जाच्या नव्हत्या त्यामुळे 12 वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र बाळासाहेब यांच्या या निर्णयामुळे आज अनेकांना महाराष्ट्रातील अनेक उत्तम संस्थांमधून शिक्षण घेणे शक्य झाले आहे. अनेकांना शिक्षणाच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत.
काय आहे काश्मीरी पंडितांची कहाणी काय आहेत त्या कधीही न भरणाऱ्या जखमा ….
१९८० नंतर काश्मीर खोऱ्यामध्ये इस्लामिक दहशतवाद हा हळूहळू डोके वर काढत होता, आणि त्याला पाकिस्तानचं पाठबळ मिळत होतं. बांगलादेशच्या निर्मितीचं दुःख आणि पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला होता.
म्हणूनच खोऱ्यामध्ये अशांतता पसरवण्याचे उद्योग पाकिस्तान कडून सुरू होते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घुसवले जात होते, आणि काश्मीरमधील मुस्लिमांना आझाद काश्मीरचं आमिष दाखवून भडकवण्यात येत होतं.
आणि पुढच्या १० वर्षात इस्लामिक दहशतवादाने काश्मीर खोऱ्याचा पूर्ण ताबा घेतला. तरीही धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्या विश्वासावर अल्पसंख्य काश्मिरी पंडित, मुस्लीमबहुल प्रदेशात तग राहून राहिले होते.
परंतु १९ जानेवारी १९९० यादिवशी इस्लामिक दहशतवादाचा क्रूर ,काळा चेहरा त्यांना दिसला.
१९ जानेवारीच्या रात्री हजारो मुस्लिम तरुण घोषणा देत रस्त्या रस्त्यावर फिरत होते. श्रीनगरमध्ये लाऊड स्पीकर वरून जिहादींना चिथवण्यात येतं होतं. ‘हमे क्या चाहिये आजादी ‘, ‘ए जालीमो, ए काफीरो, काश्मीर हमारा है, छोड दो’, ‘काश्मीर मे रहना होगा, अल्लाहू अकबर कहना होगा’, ‘यहा क्या चलेगा निजाम ए मुस्तफा’, ‘इस्लाम हमारा मकसद है, कुरान हमारा दस्तूर है, जिहाद हमारा रस्ता है’, अशा त्या घोषणा होत्या.
काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या घरासमोर हा जिहादी उन्माद सुरू होता.
मशिदिंमधून अफगाणिस्तानातल्या मुजाहिद्दीनींचा गौरव करणारे भाषण एकवले जात होते.
‘काश्मिर हा पाकिस्तानचा भाग आहे, त्यामध्ये हिंदू काश्मिरी पंडितांना स्थान नाही मात्र त्यांच्या बायकांना स्थान आहे’. अशा प्रकारचे नारे दिले जात होते.“
इथून निघून जा, धर्मांतर करा किंवा मरा” – हे तीनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवले जात होते.त्यावेळेसचं फारूक अब्दुल्ला सरकार निष्क्रिय होतं. काश्मीरचे राज्यपाल जगमोहन हे दहा तारखेच्या आदल्या दिवशी राज्यपाल झाले होते आणि खराब हवामानामुळे ते जम्मू मध्ये थांबले होते. हिवाळ्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरवरून जम्मूला हलवली होती.
त्यामुळेश्रीनगरच्या सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्या नगण्य होती आणि कोणतीही ऑर्डर नसल्यामुळे लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्या रात्री कोणताही हस्तक्षेप केला नाही.
एकदम असहाय्य, हतबल आणि प्रचंड भीती अशा वातावरणात काश्मिरी पंडितांनी ती रात्र काढली. स्वतंत्र भारतात आपण असुरक्षित आहोत ही भावना त्या रात्री काश्मिरी पंडितांच्या मनात भरून राहिली.
त्या रात्री प्रत्येक काश्मिरी पंडित जागा होता, पण असहाय्य होता.
घरातले दिवे त्यांनी बंद केले होते, घरातला आवाज बाहेर जाऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते. अगदी लहान मुलांनाही शांत बसवलं गेलं होतं. त्यांना काही होऊ नये एवढीच प्रार्थना आई-वडील करत होते.
ती रात्र संपली आणि दुसर्या दिवशी मात्र काश्मिरी पंडितांनी आपल्यासोबत थोडेफार सामानसुमान घेऊन काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला.
फाळणी नंतरचं हे सगळ्यात मोठं स्थलांतर सुरू झालं. मिळेल ती बस, ट्रक, टेम्पो या मिळेल त्या वाहनांनी ते खोऱ्यातून बाहेर पडले.
काही काश्मिरी पंडितांना मात्र आपलं मूळ घर सोडवत नव्हतं. आपल्या सफरचंदाच्या बागा, मंदिर, जमीन आणि ज्या गावात आपण मोठे झालो तिथल्या आयुष्यभराच्या आठवणी, आपले शेजारी आपल्या सोबत आहे यावरचा विश्वास म्हणून ते तिथेच राहिले.
काहीजणांना देशाच्या इतर भागात निर्वासित म्हणून राहणे मान्य नव्हते यासाठी ते तिथेच राहिले. मात्र नंतर त्यांचेही क्रूर हत्याकांड घडवण्यात आले आणि यातल्याच क्रूरपणाच्या किळसवाण्या काही गोष्टी आजपर्यंत लोकांना माहिती नाहीत.
संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पंडितांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांनी हत्याकांड सुरू केलं.
स्त्रियांची अब्रू लुटली आणि नंतर त्यांना मारून टाकलं. अगदी लहान मुलांनाही त्यांनी सोडलं नाही.
हे दहशतवादी रात्रीतून एखाद्या काश्मिरी पंडितांच्या घरावर आक्रमण करायचे त्यावेळेस घरातल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी कपाटामध्ये, ट्रंकमध्ये, अडगळीच्या खोलीत लपवलं जात असे.
जरी तिथेपर्यंत दहशतवादी आलेच तर पोटात सुरा खुपसून मरण्याची तयारीही काश्मिरी पंडितांच्या स्त्रियांनी ठेवली होती.
सर्वानंद कौल प्रेमी या काश्मिरी पंडिताच्या कपाळावर खिळा ठोकून ठार मारण्यात आले.
बी. के. गांजू यांच्या घरात जेव्हा दहशतवादी घुसले. त्यावेळेस गांजू हे एका तांदळाच्या कंटेनर मध्ये लपून बसले. अतिरेक्यांनी त्या कंटेनर वर गोळ्या झाडल्या.
त्या तांदळाला त्यांचे रक्त लागलं आणि ते रक्ताळलेले तांदूळ त्यांच्या पत्नीला खायला लावले गेले.आता त्यांच्या पत्नी आणि मुलगी अमेरिकेत राहतात.
आजही त्यांना भात दिसला तरी त्यांच्या अंगावर शहारा येतो आणि त्या किंचाळतात.
सरला भट या नर्स वर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. तिचं नग्न शरीर रस्त्यावर फेकून देण्यात आलं.
एक प्रेग्नेंट शिक्षिका आपला पगार घेऊन काश्मीर सोडायच्या विचारात होती तिला गाठून तिचे अक्षरशः दोन तुकडे करून मारून टाकण्यात आलं. रवींद्र पंडित यांच्या मृतदेहावर जिहादी मंडळींनी नाच केला.
ब्रिजलाल आणि त्याच्या मुलीला मारून जीपला बांधून दहा किलोमीटर पर्यंत फरफटत नेण्यात आलं
एका ठराविक समूहाला टार्गेट करून त्यांना संपवण्याचा कट करण्यात आला. अनेक काश्मिरी वकील न्यायाधीश उच्च पदावरील अधिकारी यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे जवळपास चार लाख हिंदू काश्मिरी पंडित हे देशोधडीला लागले.
काश्मिरी हिंदू पंडितांच्या मुलांच्या शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात यायची. काश्मिरी पंडितांना हरतऱ्हेने घाबरवण्याचा प्रयत्न आणि काश्मीर खोऱ्यातून हुसकावून लावण्याचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे दहशतवाद्यांनी राबवला.
खोऱ्यातील जवळजवळ ५०००० हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदू महंतांना धर्मांतर करण्यास सांगण्यात आलं आणि नाही ऐकलं त्या सगळ्यांच्या हत्या झाल्या.
महंत पंडित केशवनाथ यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या मुस्लिम पोलीस शिपायाने केली कारण त्यांनी धर्मांतरास नकार दिला.
दहशतवाद्यांच्या हुकुमाचे पालन न केल्यास अपहरण, धमक्यांची सत्र, मालमत्ता लुटी अशा गोष्टी तिकडे सुरू होत्या.
१९९० साली लोकसंख्येच्या दहा टक्के असलेले, २००० सालापर्यंत दोन-तीन टक्क्यांवर आले आणि आता तर त्यांची काश्मीर खोऱ्यातील संख्या एक टक्क्याहून कमी आहे.
जगभर एखाद्या छोट्या घटनेनं खुट्ट जरी झालं तरी मानवी अधिकारांची आवई उठवणाऱ्या जागतिक मानवी आयोगाने सुद्धा या सगळ्या घटनांकडे केवळ दुर्लक्ष केलं.
अगदी अ्ँमनेस्टी इंटरनॅशनल आणि एशिया वॉच या संघटनांनी पण काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली नाही.
काश्मीर खोऱ्यातून निघून जाण्यासाठी जबरदस्तीने प्रवास केल्यामुळे कित्येक हिंदू काश्मिरी पंडित मरण पावले.
त्यांना थंड हवामानाची सवय असल्यामुळे भारतातल्या इतर प्रदेशातील उष्ण हवामान सहन झाले नाही बऱ्याच जणांना उष्णतेचा फटका बसला त्यात कितीतरी मृत्यू झाले.
त्यांच्यासोबत इतक्या प्रकारचं भयंकर कृत्य झालेलं असल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक, मानसिक दबाव याचा सामना करावा लागला.
काश्मीर खोऱ्यात त्यांच्या राहण्याची आणि नोकरीची सोय होती. परंतु भारताच्या इतर शहरात आल्यावर त्यांना नोकरीसाठी वणवण करावी लागली.
सरकारने त्यांना कोणतीही मदत देऊ केली नाही. फक्त त्यांच्यासाठी छावण्या मात्र उभारल्या.
त्या छावण्या म्हणजे झोपडपट्टी सारखीच परिस्थिती होती. कित्येक काश्मिरी पंडित तिथे साप चावून मृत्युमुखी पडले. कित्येकांना टायफाईड वगैरे आजार होऊन मरण आलं.
इतके उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील लोकांवरही अशी वेळ आली.
पुढचं भविष्य काय आहे याची माहिती नसताना केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी, पोरीबाळांची इज्जत सांभाळण्यासाठी स्वतःचं घरदार, नोकरी, शिक्षण शाळा-कॉलेजेस सोडून येणं किती अवघड आहे!
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोयही होत नव्हती. १९९५ नंतर जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलांना प्रवेश देण्यासाठी कोटा अंतर्गत प्रवेश द्यायला सांगितला.
मुस्लिम मतांसाठी आंधळं झालेलं काँग्रेस सरकार हे ‘सेक्युलरीझम’चा झेंडा घेऊन परिस्थितीकडे दुर्लक्ष करत होते आणि विरोधी पक्षांकडे या परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, मदत करण्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं सामाजिक, आर्थिक पाठबळ नसल्याने विरोधक सुद्धा हतबल होते. संपूर्ण हिंदुस्तानात केवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांना कोणत्याही राजकीय हेतुशिवाय मदत केली होती.