“द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात राहणे “असुरक्षित” वाटत होते. भारतात “असहिष्णूतेची लाट” आल्याचे भासत होते.The Kashmir Files: 150 crore figure, Bollywood’s “eating parrots” turn 360 degrees and speak sweetly
भारत सोडून अन्य सुरक्षित देशात अमीर खान आणि त्याची बायको निघून जाणार होते… त्याच अमीर खानला आता “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा पाहायची इच्छा झाली आहे… नव्हे, नव्हे तर त्याला मानवता देखील आठवली आहे…!! काश्मिरी हिंदूवरच्या अत्याचाराने त्याचे “दिल” दुखले आहे. सगळ्या हिंदुस्थानींनी हा सिनेमा पाहावा असे अमीर खानला वाटते आहे… हे सोपे नाही… ही बाब वरवर पाहण्याची नाही. पण अमीर खानने “द काश्मीर फाईल्स” सिनेमाची स्तुती केल्यामुळे भोळे भाबडे सेक्युलरिस्ट हिंदू हुरळून गेले आहेत…!!
मिठी छुरी
पण थांबा… अमीर खानच्या चलाख स्तुतीने हुरळून जाण्याची एवढी गरज नाही. कारण या ही स्तुतीच मिठी छुरी ठरू शकते… ही मिठी छुरी दुसऱ्या एखाद्या विषयात हिंदूंना घातक ठरू शकते.
खानावळीची मक्तेदारी मोडीत
आता पर्यंत १०० कोटींचा क्लब हा बॉलिवूडमधल्या खानावळीला आपलीच मक्तेदारी वाटत होती. आपण करू ती फिल्म, आपण मांडू तो विषय आणि आपण रिलीज करू ती ईदची डेट हे सगळे बॉलिवूड “बंद अपनी मुठ्ठी”मे वाटत होते…!! पण आता बॉलिवूडच्या खानावळीच्या मक्तेदारीलाच “द काश्मीर फाईल्स”ने धक्का दिला आहे. हा धक्का साधा नाही…
असे धक्के बॉलिवूडला सैराट सारखा सिनेमांनी पण दिले आहेत. पण “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा सहज धक्का देणारा विरळा ठरणारा सिनेमा नाही… अजून असे धक्के देणारे बरेच सिनेमे रांगेत आहेत. पुढे येणार आहेत. बॉलिवूडची इको सिस्टिम भेदणार आहेत, याची जाणीव बॉलिवूडच्या पोपटांना आणि खानावळीला झाल्याचे दिसून येत आहे. भारत – पाकिस्तान फाळणी सारख्या विषयांवर सिनेमे बनणार आहेत. म्हणूनच अमीर खान सारख्यांनी “द काश्मीर फाईल्स”ची स्तुती केली आहे… ही अमीर खान आणि बॉलिवूडच्या खानावळीची चतुर खेळी आहे…!!
बॉलिवूड बाजूला पडण्याची भीती आणि पुढची व्यावसायिक गणिते
संपूर्ण देश एकीकडे “द काश्मीर फाईल्स”ला डोक्यावर घेत असताना बॉलिवूड त्यापासून दूर राहिले असे चित्र दिसले तर ते आपल्या पुढच्या व्यावसायिक सिनेमांना घातक ठरू शकते, हा धोका दिसल्यानंतर अमीर खानने “द काश्मीर फाईल्स” सिनेमाची स्तुती केली आहे आणि त्याच्या शेजारी उभी राहून अलिया भटने टाळ्या वाजविल्या आहेत, हे “उघडून डोळे नीट बघितले पाहिजे”… उगाच अमीर खानने केलेल्या स्तुतीच्या पाटात वाहून जाण्यात मतलब नाही…!!