• Download App
    मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीचThe intricate structure of the brain is like a grand factory

    मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच

    मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग फार महत्वाचा मानला जातो. कारण यातून शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांवर पर्यायाने साऱ्या शरीरावरच नियंत्रण ठेवले जात असते.The intricate structure of the brain is like a grand factory

    प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वांत मोठा भाग असून त्यावर असलेल्या एका अर्धवट खाचेमुळे प्रमस्तिष्काचे दोन गोलार्धात विभाजन झालेले असते. या दोन गोलार्धांना उजवे प्रमस्तिष्क आणि डावे प्रमस्तिष्क म्हणतात.

    दोन्ही गोलार्ध प्रमस्तिष्काच्या तळाशी चेतातंतूंच्या जुडग्यांनी एकमेकांना जोडलेले असतात. या जुडग्यांमध्ये महासंयोजी पिंड म्हणजेच कॉर्पस कॅलोझम सर्वांत मोठा असतो. प्रमस्तिष्क गोलार्धाच्या बाह्यभागाला प्रमस्तिष्क बाह्यांग किंवा सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात. बाह्यांग मुख्यत: चेतापेशी, चेताजाल, सहयोगी पेशी, संपर्कस्थाने आणि रक्तवाहिन्या मिळून झालेल्या करड्या रंगाच्या पदार्थापासून ग्रे मॅटर बनलेले असते.

    ते दोन ते चार मिली मीटर जाड असते. त्यावर खोलवर वळ्या दिसून येतात. अशा दोन वळ्यांमधील खाचांना सीता म्हणतात. बाह्यांगाच्या करड्या पदार्थाखाली व्हाइट मॅटर असतो. हा पदार्थ मुख्यत: मायलीनयुक्त चेतातंतूंनी बनलेला असल्याने पांढरा दिसतो.

    दोन्ही गोलार्ध चार-चार खंडांमध्ये विभागलेले असतात; हे खंड म्हणजे ललाटपाली (फ्रंटल लोब), पार्श्विका पाली (पॅरायटल लोब), शंख पाली (टेम्पोरल लोब) आणि पश्चकरोटी पाली (ऑक्सिपीटल लोब). प्रत्येक पाली एकदोन मुख्य कार्यप्रकारांशी निगडित असते. ललाटपालीला आपले व्यक्तिमत्त्व आणि संज्ञापन यांचा नियंत्रक फलक म्हणता येईल.

    ललाटपालीकरवी विचार करणे, निर्णय घेणे, नियोजन करणे अशा उच्च मानसिक प्रक्रिया होतात. तसेच चालण्यासारख्या ऐच्छिक शरीरक्रियांचे नियमन याद्वारे होते. पार्श्विका पालीद्वारे संवेदी माहिती एकत्रित करणे, संख्या आणि त्यांतील संबंध ओळखणे, वस्तू हाताळणे इ. क्रिया होतात, शंख पालीद्वारे दृक-श्राव्य स्मृती, भाषा, श्रवण आणि उच्चार इत्यादी बाबींचे नियंत्रण होते, तर पश्चकरोटी पालीद्वारे दृश्य ग्रहण करणे, दृश्य हालचालींचा अर्थ लावणे आणि रंग ओळख इत्यादी क्रिया नियंत्रित होतात.

    The intricate structure of the brain is like a grand factory

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!