• Download App
    खुशखबर : वर्षांवरील मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळणार कोरोना लस The good news is, kids over the age of one will get the corona vaccine from the first week of October

    खुशखबर : १२ वर्षांवरील मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळणार कोरोना लस

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोनाविरूद्धच्या लढाईत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता लवकरच देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. The good news is, kids over the age of one will get the corona vaccine from the first week of October

    ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल. DCGI कडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही लस देण्यात येणार आहे.



    सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितलं की, भारतात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही.

    उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असून जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत.

    The good news is, kids over the age of one will get the corona vaccine from the first week of October

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…