• Download App
    The Focus India Exclusive : उत्तर प्रदेश सत्तेचा X-FACTOR- महिला मतदार ! मोदी योगी सरकारची ' शक्ती द पॉवर '!'गुंडाराज ते योगिराज ' भाजपच्या 'विजया'चं गुपित ... The Focus India Exclusive: Uttar Pradesh Power X-FACTOR-Women Voters! Modi Yogi government's 'Shakti the Power'! 'Gundaraj to Yogiraj' The secret of BJP's 'victory' ...Vijaya Rahatkar

    The Focus India Exclusive : उत्तर प्रदेश सत्तेचा X-FACTOR- महिला मतदार ! मोदी योगी सरकारची ‘ शक्ती द पॉवर ‘!’गुंडाराज ते योगिराज ‘ भाजपच्या ‘विजया’चं गुपित …

    • उत्तर प्रदेश चा निवडणुकीची खरी ताकत…शक्ती …x factor म्हणजे महिला मतदार …उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिला मतदारांचे महत्व दर निवडणुकीत वाढत आहे .महिला मतदारांचा हा वाढता टक्का आणि महिलांचा मोदी योगिंवर असणारा विश्वास म्हणजेच भाजपचा विजय ….The Focus India Exclusive: Uttar Pradesh Power X-FACTOR-Women Voters! Modi Yogi government’s ‘Shakti the Power’! ‘Gundaraj to Yogiraj’ The secret of BJP’s ‘victory’ …Vijaya Rahatkar

    माधवी अग्रवाल

    औरंगाबाद: २००७ पर्यंत ४० टक्के सुद्धा  महिला मतदान करत नव्हत्या मात्र २०१७ पासून हे चित्र बदललं आणि याचा थेट फायदा झाला तो भाजप सरकारला .तीन तलाख च्या मुद्द्यावर मुस्लिम महिला मतदारांनी भाजपला जोरदार मतदान केले .तर उत्तर प्रदेश मध्ये कायदा अन् सुव्यवस्था प्रस्थापित करून महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी योगिंनी घेतलेल्या निर्णयामुळे महिला मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्या . त्यांना गुंडाराज नको होते तर त्यांना हवे होते मोदी योगिंचे राज्य …सुरक्षित अन् स्वतंत्र ..The Focus India Exclusive: Uttar Pradesh Power X-FACTOR-Women Voters! Modi Yogi government’s ‘Shakti the Power’! ‘Gundaraj to Yogiraj’ The secret of BJP’s ‘victory’ …Vijaya Rahatkar

    २५ लाख महिलांना पहिल्यांदाच घर स्वतः च्या नावावर मिळालं ते मोदी सरकारमुळे …. यूपी च्या भगिनींना सर्वात जास्त त्रास होता तो गुंडांचा …त्यांना आळा बसवला तो योगी राज ने …मुलींना शाळेत कॉलेजात पाठवायला देखील पालक घाबरत होते त्याच उत्तर प्रदेश च सत्ता समीकरण बदललं ते महिलांमुळे …मुस्लिम महिलांनी देखील मोदींना भरभरून आशीर्वाद दिले …त्यांना चौकटीबाहेर काढून वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या तीन तलाखच्या दहशतीतून मुक्त केलं  ते मोदी सरकारने …आता बहिणीचा जीव वाचवण्यासाठी कुठल्याही सचिनला आपले बलिदान द्यावं लागणार नाही .

    या  निवडणुकीची एक बाजू सांभाळली ती महाराष्ट्राच्या कन्येने..विजया रहाटकर यांनी …त्यांनी उत्तर प्रदेश चा लेखाजोखा आपल्या समोर मांडला ..

    उत्तर प्रदेशच्या लाखो महिलांनी मोदी योगींवर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या त्याबद्दलच्या भावना जाणून घेत त्या आपल्या समोर
    आपल्याच  भाषेत मांडल्या त्या विजया रहाटकर यांनी …

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर (Vijaya Rahatkar)  वाराणसीत तळ देऊन बसल्या होत्या .

    फक्त वाराणसी नव्हे, तर या विभागातील नऊ जिल्ह्यांमधील महिला कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर साहित्यकार, कलाकार, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योजक यासारख्या प्रभावशाली मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारीही पक्षाने त्यांच्याकडे सोपविली .

    वाराणसीला मुक्काम हलवण्यापूर्वी त्या लखनौ, अयोध्या, प्रयागराजमध्ये बसून समन्वयाची जबाबदारी पार पाडत होत्या. सुमारे महिनाभरापासून त्या उत्तर प्रदेशात आहेत.

    मोदी-योगी डबल इंजिन सरकार पुन्हा येणार असल्याबद्दल त्या अगदी ठाम आहेत. त्या म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत योगी सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. जीडीपी दुप्पट झालाय. कोरोनाच्या संकटातही बेरोजगारीचा दर १७ टक्क्यांवरून फक्त ४.५ टक्क्यांवर आलाय. हे राज्य देशातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनले आहे. या ही पलीकडे जाऊन कणखर कायदा व सुव्यवस्था हे योगी सरकारचे सर्वांत बलस्थान राहिले आहे. जनतेला समाजवादीचे गुंड नको आहेत.

    यूपीत पुन्हा भाजपला यश मिळवून देण्यात महिला सर्वाधिक पुढे असतील, असेही त्या म्हणाल्या. त्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, दीड कोटी घरांमध्ये वीज कनेक्शन, ४० लाख गरिबांना घरे, २९ लाख घरांमध्ये नळाने शुद्ध पाणीपुरवठा, सुमारे एक कोटी जनधनची खाती, उज्ज्वला योजनेचा लाखोंना लाभ यामुळे महिला मोदींसोबत आहेत. योगींनी त्या सुरक्षा दिलीय. कोरोना काळात मोदी सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे महिला समाधानी आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    उत्तर प्रदेशातील योगी सरकारने महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने आधीच अस्तित्वात असलेल्या केंद्रीय योजनांव्यतिरिक्त महिलांशी संबंधित अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

    UP महिला समर्थ योजना 2021 मध्ये सुरू झाली आहे. याअंतर्गत महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. सरकारने मिशन शक्ती-निर्भया एक पहल योजना सुरू केली आहे. तर इतर योजना ह्या कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना मदत करतात.

    त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केंद्राच्या योजनांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जात आहे. महिलांच्या नावाने शिधापत्रिका बनवण्यात आली. याशिवाय पंतप्रधानांच्या घरांची रजिस्ट्रीही महिलांच्या नावावर केली जात आहे. हर घर जल से नल योजनेतही महिला केंद्रस्थानी आहेत.

    काय आहे महिलांची भूमिका ...

    2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या विजयात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकनीती-CSDS सर्वेक्षणानुसार, या काळात 32% महिलांनी बसपाला मतदान केले. त्यामुळे बसपाने 206 जागा जिंकून सरकार स्थापन केले.

    2012 च्या निवडणुकीत महिलांनी सपाला पाठिंबा दिला होता. यावेळी 31% महिलांनी सपाला मतदान केले. त्यामुळे सपाला 224 जागा जिंकण्यात यश आले. या दरम्यान सपाने सरकार स्थापन केले.

    2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महिलांमुळे मोठा विजय नोंदवला. या काळात 41 टक्के महिलांनी भाजपला मतदान केले. यासह भाजपने 312 जागा जिंकून सरकार स्थापन केले.

    The Focus India Exclusive: Uttar Pradesh Power X-FACTOR-Women Voters! Modi Yogi government’s ‘Shakti the Power’! ‘Gundaraj to Yogiraj’ The secret of BJP’s ‘victory’ …Vijaya Rahatkar

    Related posts

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी