• Download App
    आधुनिक मानवाचा उत्क्रांतींच्या विविध टप्प्यांवरील वाढता विकास|The evolution of modern man at various stages of evolution

    विज्ञानाचे डेस्टिनेशन्स : आधुनिक मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवरील वाढता विकास

    आधुनिक मानव व उत्क्रांतींच्या विविध टप्प्यांवर असलेले जीवाश्म मानव आणि यांखेरीज असणारे इतर प्रायमेट प्राणी यांच्यात अनेक बाबतींत फरक आहेत. मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात मानव कोणाला म्हणायचे, यासाठी पुढील काही वैशिष्ट्यांचा विचार केला जातो. दोन पायांवर चालणे, अवजारांचा व हत्यारांचा वापर, अग्नीचा वापर आणि प्रक्रिया करून अन्न खाणे, शरीररचनेतील बदल, मोठा आणि अधिक गुंतागुंतीची रचना असलेला मेंदू, अन्न मिळून खाणे,The evolution of modern man at various stages of evolution

    बालकांची निगा व सामाजिक अनुबंधांची निर्मिती, परस्परसंवादासाठी रंग, शब्द, प्रतीके व भाषेचा वापर आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याखेरीज ती परिस्थिती बदलण्याची मानसिक क्षमता. याशिवाय विचार करणारे व सर्जनशील मन, काल व अवकाश या संकल्पनांचे आकलन असलेली बुद्धी, स्वभान आणि आपण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे असल्याची जाणीव ही इतर काही मानवी वैशिष्ट्ये आहेत.

    जरी इतर कपींप्रमाणेच शरीररचना असलेल्या प्राण्यांप्रमाणेच मानवाचे पूर्वज असले, तरी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर वरीलप्रमाणे हळूहळू बदल घडून आजच्या मानवजातीचा उदय झाला. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस जाती उत्पन्न झाल्या; परंतु आज फक्त होमो सेपियन्स टिकून आहेत. मानवी उत्क्रांतीच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन जीवाश्मांचा शोध लागतो. अगोदरच्या काळात मिळालेल्या जीवाश्मांचा नव्याने अभ्यास होतो. कालमापनातील प्रगतीमुळे मानवी उत्क्रांतीच्या कालक्रमात बदल घडून येतात.

    तसेच प्राचीन डीएनए रेणूंवरील संशोधनामुळे नवीन माहितीवर आधारित नवे सिद्धांत मांडले जातात. म्हणूनच या क्षेत्रात अनुमानांमध्ये सतत बदल होताना दिसतात. सध्या मानवी जीवनाच्या तसेच्या त्याच्या हजारो वर्षांपासूनच्या इतिहासाचा व पुढील वाटचालीचा शोध घेण्यासाठी संशोधक सतत प्रयत्न करीत असतात. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता ममीजचा वापर केला जात आहे. त्यांच्या हाडांचा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने अभ्यास करून काही माहिती मिळते का याचाही सध्या वेगाने अभ्यास सुरु आहे.

    The evolution of modern man at various stages of evolution

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!