ईडीने दिलेल्या माहिती नुसार, राज कुंद्रा यांना फेमा अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केल्या संदर्भात पुरावा मिळाल्यानंतर आता ईडी देखील पुढे तपास करणार आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास एजन्सी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची एफआयआर मागवेल आणि लवकरच गुन्हा नोंदवेल. आणि तपासाला पुढे सुरुवात होईल. The ED’s entry in the porn film racket case will now be filed against Raj Kundra under FEMA
ईडीने दिलेल्या माहिती नुसार, राज कुंद्रा यांना फेमा अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहता तिचीही चौकशी केली जाईल.
राज कुंद्रावर पॉर्न रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात पैशांच्या व्यवहाराचीही चर्चा आहे. ‘येस बँक’ खाते आणि राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी यांच्या यूबीए खात्यामधील व्यवहाराची चौकशी करायची आहे. ईडी फेमाच्या नियमांतर्गत चौकशी करेल.
राज कुंद्रा आणि त्याचे आयटी प्रमुख रायन थॉर्पे 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीमध्ये आणि मोबाइल अॅप्सद्वारे त्याचे प्रसारण केल्याप्रकरणी राज कुंद्रा यांच्यासह 10 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवारी मुंबई पोलीस गुन्हे शाखेची पथक छापा टाकण्यासाठी गेली होती आणि राज कुंद्रा संदर्भात शिल्पा शेट्टी यांच्या घराची चौकशी केली. राज कुंद्रायांच्यावर लंडनमधील एका कंपनीबरोबर हॉटशॉट्स या मोबाइल ॲपद्वारे पॉर्न व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे.
The ED’s entry in the porn film racket case will now be filed against Raj Kundra under FEMA
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान
- दोन अपत्यांचेच धोरण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची संसदेत माहिती
- ममता सरकारने पश्चिम बंगाल बोर्डाचा टॉपर विद्यार्थी मुस्लिम असल्याचा मुद्दाम केला उल्लेख, भाजपने केला तुष्टीकरणाचा आरोप
- भारतातील कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षी चांगला वाढणार, पाहा कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढणार मागणी