प्रतिनिधी
पुणे: राज्यातील शाळा सुरू होण्याची चर्चा सुरू असली तरी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय होणारअसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. The decision to start the school will be taken only under the guidance of the task force experts
विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोविड योग्य वर्तन जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोविड केअर सेंटर, शासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आली आहे
The decision to start the school will be taken only under the guidance of the task force experts
महत्वाच्या बातम्या
- मराठा विद्यार्थ्यांसाठी तर वसतिगृहे फडणवीस सरकारने बांधली, तुम्ही फक्त उद्घाटने करणार…!!; खासदार संभाजी राजेंचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- स्वत : ला मुल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचा दिला बळी, कागल तालुक्यातील घटना
- ‘हनीट्रॅप’द्वारे तरुणास 20 लाख रुपयांना लुटले, इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीने शरीरसंबंध करण्यास पाडले भाग
- Afghanistan Crisis : ‘काबूल एक्स्प्रेस’मध्ये काम करणारा अभिनेता भूमिगत, तालिबान्यांनी घर फोडले, दिग्दर्शक कबीर खानचा खुलासा