नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना कथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला ठोकून काढले. त्या वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रोफेसर धर्मपाल, मजरूह सुलतानपुरी आणि किशोर कुमार यांची नावे घेत काँग्रेसी सरकारांनी त्यांना कसा त्रास दिला याचा उल्लेख केला होता.The Commonwealth slave is Nehru balraj sahahni
यातल्या प्रख्यात शायर आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा नेमका किस्सा काय आहे?, याचा शोध घेतला असता पुढील बाब लक्षात आली. मजरूह सुलतानपुरी हे डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीचे शायर आणि लेखक होते. 1948 – 49 मध्ये मुंबईतल्या एका कामगार संपाच्या वेळी त्यांनी एक गीत गायले. यावेळी त्यांच्या समवेत प्रख्यात अभिनेते बलराज सहानी हे देखील होते. बलराज सहानी हे देखील कम्युनिस्ट विचारसरणीचे कलावंत होते. मुंबईतल्या कामगारांच्या संपाच्या वेळी मजरूह सुलतानपुरींनी गीत गायले, “कॉमनवेल्थ का दास हे नेहरू”…!!
त्यावेळी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते, मोरारजी देसाई. त्यांनी मजरूह सुलतानपुरी आणि बलराज सहानी यांना नेहरूंवरील टीकेनंतर आर्थर रोडच्या तुरुंगात डांबले. काही दिवसांनंतर मजरूह सुलतानपुरी यांच्यापुढे पंडित नेहरूंची माफी मागण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. परंतु, त्यांनी माफी मागायला नकार दिला. त्यामुळे मोरारजी देसाई यांनी त्यांना मजरूह सुलतानपुरी आणि बलराज सहानींना तब्बल 2 वर्षे तुरुंगाची हवा खायला लावली होती. मजरूह आणि बलराज सहानी हे दोघेही उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे नव्हते. ते कम्युनिस्ट होते. तरी देखील नेहरू आणि मोरारजी जोडगोळीने त्यांना सोडले नाही. मोदींच्या आजच्या राज्यसभेच्या वक्तव्यानंतर इतिहास तपासला असता वर उल्लेख केलेला धांडोळा घेता आला.
The Commonwealth slave is Nehru balraj sahahni
महत्त्वाच्या बातम्या
- शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका; प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत; लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद
- संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रही; कामगार गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी!!
- आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न