• Download App
    मानवी भाषेवर नियंत्रण ठेवणारा मेंदू|The brain that controls human language

    मेंदूचा शोध व बोध : मानवी भाषेवर नियंत्रण ठेवणारा मेंदू

    एकदा पॉल ब्रोका नावाच्या एका डॉक्टरांकडे एक पेशंट आला. तो फक्त टॅन हा एकच उच्चार करू शकायचा. तपासताना असं लक्षात आलं की, त्याच्या डोक्याच्या डाव्या भागाला इजा झाली होती. इजा होण्यापूर्वी तो व्यवस्थित बोलू शकायचा. त्यावर त्यांनी अजून खोलात जाऊन संशोधन केलं, तेव्हा त्यांना मेंदूच्या याच क्षेत्रात भाषेचं काम चालतं हे लक्षात आलं.The brain that controls human language

    हा अतिशय महत्त्वाचा शोध लावल्याबद्दल मेंदूचं हे क्षेत्र आज ब्रोका केंद्र म्हणून ओळखलं जातं. या केंद्राला लागून दुसरे केंद्र आहे त्याचं नाव वानक केंद्र. कार्ल वानक या शास्त्रज्ञाचं नाव या केंद्राला देण्यात आलं आहे. कारण त्यांच्याकडे असे पेशंट्स आले होते, ते बोलू शकायचे. पण आपण काय बोलतोय हे त्यांना समजायचं नाही. यावरून वानक यांनी या भागात भाषेच्या आकलनाचं महत्त्वाचं काम चालतं, हा निष्कर्ष मांडला.

    मूल जन्माला येतं तेव्हापासूनच वानक क्षेत्राचं काम चालू असतं. त्यामुळे आपण मुलांशी जे बोलतो ते मुलांना कळत असतं. ब्रोका केंद्राचं काम मात्र उशिरा चालू होतं. वय वर्ष दीड-दोन – काही जण अडीच वर्षांचे होईपर्यंत बोलत नाहीत. त्याला कारण हे केंद्र. हे केंद्र एकदा विकसित झालं की मुलं बोलायचं थांबत नाहीत. मग वय वाढेल तसा त्यांच्या मेंदूचा विकासदेखील सुरु होतो आणि विकासाचा वेगदेखील वाढू लागतो.

    त्यामुळे मुलांची काळजी घेताना त्यांना लहानाचे मोठे करताना त्यांना काय खायला द्यायचे काय नाही याचा पालक फार गांभीर्याने विचार करतात. मात्र त्याचबरोबर त्यांच्या मेदूंच्या विकासासाठी त्यांच्या भरपूर गप्पा मारणेदेखील फार गरजेचे असते.

    काही माणसे फार सुंदर बोलतात असे आपण नकळतपणे बोलून जातो. आपण बोलतो तेव्हा आपलं तोंड, स्वरयंत्र काम करत असतं. पण काय बोलायचं, काय बोलायचं नाही, कुठे थांबायचं, हळू बोलायचं की जोरात? त्यासह देहबोली कशी हवी, हे ठरवत असतो तो आपला मेंदू. मेंदूच्या डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे, असं आढळून आलेलं आहे.

    The brain that controls human language

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!