• Download App
    दिवाळीपूर्वी सहा कोटी नोकरदारांच्या खात्यावर केंद्र सरकार जमा करणार ही रक्कम The amount will be credited to the accounts of six crore employees before Diwali

    दिवाळीपूर्वी सहा कोटी नोकरदारांच्या खात्यावर केंद्र सरकार जमा करणार ही रक्कम

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सामान्य नोकरदारांना केंद्र सरकारतर्फे दिवाळीनिमित्त भेट दिली जाणार आहे. भविष्य निर्वाह निधीसाठी 2020-21 या आर्थिक वषार्साठी सरकारने 8.5 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. भविष्य निर्वाह निधी असलेल्या सहा कोटी कर्मचाऱ्याच्या खात्यात हे व्याजाचे पैसे केंद्र सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील, असं ईपीएफओनं ट्विटद्वारे म्हटले आहे. The amount will be credited to the accounts of six crore employees before Diwali

    खात्यात पैसे जमा झाले आहेत का याची खात्री करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, ईपीएफओच्या संदेशाद्वारे पीएफचा तपशील मिळेल. यासाठी तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. यूएएन नंबर नोंदणी केलेला असेल, तर एसएमएसद्वारे माहिती मिळू शकेल. यासाठी 7738299899 वर EPFOHO असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर मेसेजद्वारे माहिती मिळेल. हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही ही सेवा उपलब्ध आहे.



    ईपीएफओच्या वेबसाइटवरूनही खात्यातील शिल्लक तपासता येईल. याकरता epfindia.gov.in वर लॉग इन करून ई-पासबुकवर क्लिक करा.

    passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज ओपन होईल. इथं तुमचे युजरनेम व UAN नंबर , पासवर्ड आणि कॅप्चा भरल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर मेंबर आयडी निवडावा लागेल. त्यानंतर ई-पासबुकवर ईपीएफ खात्यातील शिल्लक दिसेल. तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी उमंग अ‍ॅपचाही वापर करता येईल.

    यासाठी उमंग अ‍ॅप ओपन करून ईपीएफओवर क्लिक करा. एम्प्लॉयी सेंट्रिक सेवा पयार्यावर (Employee Centric Services) क्लिक करा.View Passbook वर क्लिक करा. यूएएन नंबर आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा. तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक दिसेल.

    The amount will be credited to the accounts of six crore employees before Diwali

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…