- शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : वाढीव वीज बिलांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबादेत आंदोलन सुरू केले आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकरी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. शहरी आणि आणि निमशहरी ग्राहकांपाठोपाठ वीजेच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचीही तीव्र नाराजी समोर आली आहे. thackeray pawar sarkar
लोडशेडिंग बंद करून दिवसा देखील शेतकऱ्यांना वीज देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. thackeray pawar sarkar
वीजेच्या वेळेत बदल करा तसेच लोडशेडिंग बंद करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. झी २४ तासने ही बातमी दिली आहे.
thackeray pawar sarkar
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबादेत आंदोलन सुरू केले आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रात्रीतून शेतात जावे लागते म्हणून अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत तरी सुद्धा राज्य सरकार शेतकऱ्यांना वीज मध्यरात्रीच देते, जोपर्यंत वीज दिवसा मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.