- आरटीआय कार्यकर्त्याचा आक्षेप
मुंबई : ठाकरे – पवार सरकारला शेतकरी, सरकारी कर्मचारी, कोविड नियंत्रण याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात आरोप प्रत्यारोप आणि खटला चालविण्यासाठी सरकारला वेळ आहे. विशेष म्हणजे कंगनाविरोधातील खटल्यासाठी वकील उभे करण्यासाठी ठाकरे – पवार सरकारने 82 लाख उधळल्याचे स्पष्ट झाले आहे. thackeray – pawar govt pays 82 lakhs for lawyer
वांद्रे, पाली हिल येथील कंगनाच्या बंगल्यावर पालिकेने कारवाई केली. त्यानंतर कायदेशीर लढाईसाठी सरकारने 82 लाख रुपये वकीलावर उधळल्याचा आरोप झाला. त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करून कंगनाने दोन कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. त्यानंतर पालिकेने ज्येष्ठ वकील अस्मि चिनॉय यांची नियुक्ती न्यायालयीन लढ्यासाठी केली. त्यासाठी 82 लाख 50 हजार मोजले. शरद दत्ता या माहिती अधिकार कार्यकर्त्याने ही माहिती मिळवून आक्षेप याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
thackeray – pawar govt pays 82 lakhs for lawyer
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. त्यावेळी दत्ता यांनी एखाद्या महत्वाच्या खटल्यात ज्येष्ठ वकिलाची नेमणूक केली असती तर योग्य होते. परंतु कंगनाच्या सुमार याचिकेसाठी ज्येष्ठ वकील नेमण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित करून आयुक्तांनी विशेष वकील का नेमला याचे स्पष्टीकरण मागितले. तसेच याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. परंतु न्यायालयाने सुनावणीस नकार दिला असून ती आता 11 जानेवारीला घेण्यात येईल, असे सांगितले.