• Download App
    मंत्र्यांचे बंगले सजविण्यावरून अजित पवार – सतेज पाटील यांची परस्पर विरोधी विधाने | The Focus India

    मंत्र्यांचे बंगले सजविण्यावरून अजित पवार – सतेज पाटील यांची परस्पर विरोधी विधाने

    बंगल्यांच्या सजावटीचाखर्च की मंत्र्यांची स्वतःची बिले भागविण्याचा प्रकार?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे–पवार सरकारमधील मंत्र्याचे बंगले सजवायला ९० कोटी रूपये खर्च केले या बातमीवरून राज्यात राजकीय गदारोळ उठला असून दोन मंत्र्यांचीच परस्पर विरोधी विधाने पुढे आली आहेत. मंत्र्यांचे बंगले सजावटीवर ९० कोटी रूपये खर्च झाल्याचा आकडा खोटा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला, तर राज्यमंत्री सतेज पाटील यांनी येणाऱ्या अभयागतांसाठी (हा शब्द त्यांचाच आहे.) जनतेसाठी किमान बसण्याची व्यवस्था व्हाही यासाठी मंत्र्यांनी बंगल्यांवर खर्च केल्याचे म्हटले आहे.

    thackeray – pawar govt, ministers banglows renovation expenditure

    मुख्यमंत्र्यांसकट सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्याच्या सजावटीवर गेल्या वर्षभरात ९० कोटी रूपयांची बातमी फिरली. त्यात ३ ते ५ कोटींच्या रकमा, बंगल्यांमध्ये इटालियन मार्बल असे तपशील आले. त्यावरून विरोधी भाजपने सरकारला घेरले पण दस्तुरखुद्द मंत्र्यांचीच परस्पर विरोधी विधाने या विषयावर समोर आली.

    मूळात मंत्र्यांच्या बंगल्यावर ९० कोटी रूपये खर्च झाल्याचा आकडाच नाही. कारण ते आकडे अपटेड व्हायचे आहेत, असे अजितदादांनी अर्थमंत्र्यांच्या कपॅसिटीत सांगितले. आकडा कोणी, कुठून काढला की पेरला याविषयी शंका त्यांनी उपस्थित केली. तर सतेज पाटलांनी एवढ्या मोठ्या खर्चाचे अभयागतांच्या म्हणजे अभ्यागतांच्या अर्थात जनतेच्या बसण्याच्या व्यवस्थेसाठी खर्च केल्याचे सांगितले. मंत्र्यांचे बंगले जुने झालेत. मुंबईच्या हवामानात ते खराब होतात त्यामुळे ते दुरूस्त करावे लागतात, असा दावा सतेज पाटलांनी केला.

    thackeray – pawar govt, ministers banglows renovation expenditure

    तर बंगल्यांच्या सजावटीच्या खर्चाच्या नावाने हे मंत्री स्वतःची बाकीची बिले काढून घेताहेत, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.



    तर, “बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरु असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना सुद्धा मदत करा. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!