• Download App
    भोंगे काढणार नाही; ठाकरे - पवार सरकारचा राज ठाकरेंशी उभा पंगा!! Thackeray - Pawar government has a rift with Raj Thackeray

    Raj Thackeray : भोंगे काढणार नाही; ठाकरे – पवार सरकारचा राज ठाकरेंशी उभा पंगा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ईद 3 मे रोजी पर्यंतची मुदत ठाकरे – पवार सरकारला दिली होती. परंतु त्या मुदतीची वाट न बघता सरकारने भोंगे काढणार नाही, अशी भूमिका घेऊन राज ठाकरेंचे आव्हान धुडकावले आहे.Thackeray – Pawar government has a rift with Raj Thackeray

    ठाकरे – पवार सरकार मधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन चालणारे आहे. परवानगी देऊन लावलेले भोंगे काढायचे कोणतेही आदेश कोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे मंदिरे मशिदींवरचे भोंगे काढणार नाही. त्याचबरोबर कोर्टाने रात्री 10.00 ते सकाळी 5.00 विशिष्ट डेसिबल ठरवून दिलेले आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.



    राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आणि ठाण्यातल्या उत्तर सभेत मशिदींवरचे भोंगे काढावेत अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा ठाकरे – पवार सरकारला दिला होता. यासाठी त्यांनी ईद 3 मे पर्यंतची मुदत दिली होती. परंतु ठाकरे – पवार सरकारने त्या मुदतीची वाट न पाहता राज ठाकरे यांचा इशारा धुडकावला आहे. त्यामुळे ठाकरे – पवार सरकार हे राज ठाकरे यांच्याशी राजकीय पंगा तयार झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    Thackeray – Pawar government has a rift with Raj Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…