नाशिक : ठाकरे बंधू एकत्र, पवार + काँग्रेस अस्वस्थ!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधकांची एकत्रित गोची झाली आहे. वास्तविक शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या सत्तेला आव्हान देण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या गप्पा मारत आहेत, पण त्यातून महायुतीच्या सत्तेला टक्कर देणे तर दूरच, फारतर दोन्ही ठाकरे बंधू आपापल्या शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचे राजकीय अस्तित्व काही प्रमाणात टिकवून ठेवू शकतील. त्या पलीकडे सध्या तरी या बंधू ऐक्याला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. पण ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेतून पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्याला कारणही तेवढेच गंभीर आहे.Thackeray brothers unity will eat up opposition political space from Congress and Pawar NCP
– सुप्रिया सुळे + रोहित पवार खुश
वास्तविक ठाकरे बंधूंचे ऐक्य होणार या बातमीचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या पवारनिष्ठ खासदार आणि आमदारांनी हसून स्वागत केले. सुप्रिया सुळे यांनी तर घर फुटू नयेत. नाती तुटू नयेत. मी नाती फार जपते, असे म्हणत पवार घराणे देखील कधीतरी एकत्र येईल, असे भावनिक उद्गार काढले. रोहित पवारांनी नेहमीप्रमाणे आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित वगैरे बाता मारून ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे स्वागत केले. पवार घराणेही कधीतरी एकत्र येईल, असा आशावाद व्यक्त केला.
पण ठाकरे बंधूंच्या ऐक्याविषयी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी कितीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली असली, तरी मूळात पवारांच्या राष्ट्रवादीतील आणि काँग्रेस मधली राजकीय अस्वस्थता लपून राहिली नाही. आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याला कारणही तेवढेच गंभीर आहे ते म्हणजे, ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर त्यांची विशिष्ट ताकद नक्कीच वाढेल, पण त्यातून भाजप + शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला टक्कर देण्याएवढी ताकद ते लगेच निर्माण करू शकतील, अशी शक्यता नाही. पण विरोधकांची उरली सुरलेली “पॉलिटिकल स्पेस” मात्र ते नक्की काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून हिरावून घेतील. ही खरी भीती पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांना वाटली आहे. म्हणूनच शरद पवारांनी अजून ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर कुठलीच घाईघाईने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
कारण ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांची ताकद वाढून वाढून किती वाढेल, याचा अंदाज पूर्वीच्या एकत्रित शिवसेनेच्या ताकदीच्या वास्तवावरून निश्चितच घेता येईल आणि ठाकरे बंधू एकत्र असताना किंबहुना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेची सगळी एकजुटीची ऐक्याची ताकद मी साधारणपणे 70 – 72 आमदार, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर या महापालिकांवर सत्ता मिळवण्याएवढीच होती. त्यापलीकडे एकत्रित शिवसेनेची ताकद देखील संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली नव्हती. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात राजकीय वातावरण निर्मिती फार मोठी होईल, यात शंका नाही, पण त्या वातावरण निर्मितीचे रूपांतर ठाकरे बंधूंच्या फार मोठ्या बलाढ्य ताकदीमध्ये होईल, असे मानणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही.
त्या उलट ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या राजकीय वातावरण निर्मितीनंतर दोन्ही पक्षांची वाढलेली ताकद काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्या हातात उरलेली विरोधकांची “पॉलिटिकल स्पेस” मात्र खाऊन टाकेल, याची भीती वास्तवात उतरण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातले ज्येष्ठ आणि जाणते नेते अस्वस्थ आहेत.
Thackeray brothers unity will eat up opposition political space from Congress and Pawar NCP
महत्वाच्या बातम्या
- Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार
- Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या
- Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी
- UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही