TET परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार तुकाराम सुपे याच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे.
पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे : TET परीक्षा घोटाळा सूत्रधार तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तर आता जीए. कंपनीचा माजी संचालक अश्विन कुमार यांच्या घरातून 25 किलो चांदी, 2 किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.TET exam scam: 25 kg silver, 2 kg gold and diamonds seized after money laundering …
यावरुन हा TET परीक्षा घोटाळा किती मोठा आहे, याचा अंदाज येऊ शकतो. तुकाराम सुपेकडून आजवर हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम 3 कोटी 93 लाखांपर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर आणखी काही रक्कम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
1 कोटींपेक्षा अधिक रकमेचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे.
लखनऊमधून सौरभ तिवारीला अटक
पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत.
पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करणार आहेत. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.