• Download App
    Terrorists massacred Hindus by asking about religion दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले

    दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड; तरीही लिबरल पुरोगाम्यांचे हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!!

    Terrorists

    नाशिक : जम्मू – काश्मीरच्या पहलगांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड, तरीही लिबरल पुरोगामी काढतायेत हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!! असला प्रकार काँग्रेसी आणि पवारांच्या राष्ट्रवादी संस्कृतीत वाढलेल्या पुरोगाम्यांनी सुरू केलाय. राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, छाया थोरात आदींनी हिंदुत्वाच्या विरोधात ट्विट केली.Terrorists massacred Hindus by asking about religion; yet liberal progressives continue to rail against Hindus!!

    पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याने पाकिस्तानी ओवरसीज पाकिस्तानी कॉन्फरन्स मध्ये हिंदू समाजाच्या विरोधात आणि भारताच्या विरोधात गरळ ओकली. मुसलमान हे हिंदू समाजापासून वेगळे आहेत. त्यांचा धर्म, संस्कृती, भाषा परस्परविरोधी आहेत. पाकिस्तानच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना हे शिकवा. आपल्या पूर्वजांनी बलिदान करून पाकिस्तान कसे मिळवले याचा इतिहास त्यांना सांगा, टू नेशन थियरीचे महत्व पटवून द्या, असे हिंदू द्वेषी भाषण असीम मुनीर याने केले. त्यामुळे दहशतवाद्यांना हिंदू हत्याकांड घडवायला चिथावणी मिळाली. दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये धर्म विचारून 27 हिंदूंचे हत्याकांड घडविले. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासून गोळ्या घातल्या.



     

    पण हिंदूंचे हत्याकांड होऊन देखील “पवार बुद्धीच्या” काँग्रेसी लिबरल पुरोगाम्यांना दहशतवाद्यांचा इस्लामी धर्म दिसला नाही, तर त्या हत्याकांडात हिंदुत्वाचाच दोष दिसला. म्हणूनच राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, विकास लवांडे, दादा क्षीरसागर, विजय लीला बाळकृष्ण, छाया थोरात यांनी पहलगाम हत्याकांडावर संशय व्यक्त करत हिंदुत्वावर दुगाण्या झोडल्या. प्रत्यक्षात पहलगाम मध्ये ते हत्याकांड अनुभवणाऱ्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून कसे हत्याकांड केले, जाहीरपणे सांगितले. त्याचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाले. अगदी शरद पवारांना देखील गनबोटे कुटुंबाने आणि जगदाळे कुटुंबाने तो भयानक अनुभव सांगितला. पण पुरोगाम्यांच्या आमच्या “पवार बुद्धीत” त्याने काही फरक पडला नाही. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवत हिंदुत्वालाच झोडून काढले.

    सोनिया गांधींचा जावई आणि प्रियांका गांधींचा पती रॉबर्ट वाड्राने हिंदुत्ववादी सरकारलाच दोषी ठरविले, सुप्रिया सुळे यांनी तर “फायरिंग इन्सिडेंट” अशा किरकोळ शब्दांमध्ये हिंदू हत्याकांडाची वासलात लावली. त्यातून त्यांनी उमर अब्दुल्लांचा बचाव केला, पण त्यांनी पाकिस्तानचा आणि हत्याकांडाच्या मास्टर माईंडचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला नाही.

    पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने हिंदू हेट स्पीच दिले, त्यावर विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, राजू परुळेकर छाया थोरात वगैरेंनी तोंड उचकटले नाही किंवा कुठले ट्विट देखील केले नाही. पण ज्यांची हत्या झाली ते हिंदू आहेत आणि ज्यांनी हत्याकांड घडवले, ते मुसलमान आहेत हे लक्षात आल्याबरोबरच “दहशतवादाला धर्म नसतो”, असा ढोल पिटायला या पुरोगाम्यांनी सुरुवात केली. अनेकांनी तर त्या हत्याकांडाविषयी फेक न्युज पसरवून संशय तयार केला, पण या सगळ्यांनी खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा जपण्यासाठी धोकादायक सत्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली.

    Terrorists massacred Hindus by asking about religion; yet liberal progressives continue to rail against Hindus!!

    महत्वाच्या बातम्या

    
    
    					

    Related posts

    सिंधू जल करार स्थगितीने पाकिस्तानला खरा हादरा; म्हणूनच पाकिस्तानी सरकारच्या तोंडी आली युद्धाची भाषा!!

    काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

    Raj Thackeray : महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार – राज ठाकरे