Tuesday, 13 May 2025
  • Download App
    ‘तेजस’च्या तंत्रज्ञानातून झटपट ऑक्सिजन, कोरोना रुग्णांना दिलासा ; एका मिनिटात एक हजार लिटरची निर्मिती शक्य Tejas technology will produce oxygen

    ‘तेजस’च्या तंत्रज्ञानातून झटपट ऑक्सिजन, कोरोना रुग्णांना दिलासा ; एका मिनिटात एक हजार लिटरची निर्मिती शक्य

    Tejas technology will produce oxygen

    Tejas technology will produce oxygen

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गरज ही शोधाची जननी आहे , या गरजेतून जगात अनेक शोध लागले. देशात ऑक्सिजन कसा झटपट तयार करण्यावर खल सुरु असताना एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. Tejas technology will produce oxygen

    तेजस या भारतीय लढाऊ विमानातील तंत्रज्ञानाचा वापर करून देशात ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर ऑक्सिजन निर्मितीसाठी खुबीने केला जाईल.



     

    जे ऑन बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम (ओबीओजीएस) म्हणून ओळखले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तेजस लढाऊ विमानात ऑक्सिजन पुरविला जातो. या तंत्राच्या सहाय्याने तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा उपयोग नागरी हेतूसाठी केला जाईल. या ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या मदतीने, दर मिनिटाला एक हजार लिटर ऑक्सिजन तयार करता येईल आणि ऑक्सिजनची समस्या कायमस्वरूपी मिटेल.

    उत्तर प्रदेशकडून 5 प्लांट्सची मागणी

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनने (डीआरडीओ) याबाबत माहिती दिली. हे तंत्रज्ञान खासगी उद्योगात हस्तांतरित केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने अशा 5 प्लांट्सची ऑर्डर दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी संरक्षण मंत्रालयाला सांगितले की. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी अशा इतर प्लांट्स इंडस्ट्रीतून उभारता येणे शक्य आहे.

    Tejas technology will produce oxygen

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    Icon News Hub