भज्जीने ट्विट करत क्रिकेटला रामराम ठोकत असल्याची माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टीम इंडियाचा स्टार स्पिनर हरभजन सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. भज्जीने ट्विट करत क्रिकेटला रामराम ठोकत असल्याची माहिती दिली. हरभजनने सहकाऱ्यांचे, सपोर्ट स्टाफ आणि संबंधित सर्वांचे आभार मानले. Team india senior off spinner Harbhajan Singh has announced his retirement from all formats International cricket
भज्जीचे ट्विट
“सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट असतो.ज्या खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे, आज मी त्या खेळाचा निरोप घेतो आहे. ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला, मी त्या प्रत्येकाचा आभारी आहे”, असं ट्विट भज्जीने केलंय.
भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द
भज्जीने 1998 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर आता त्याने 23 वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतलाय. भज्जीने वयाच्या 17 वर्षात कसोटी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता भज्जी 41 वर्षांचा आहे.
भज्जीने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भज्जीने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 बळी घेतले. तर टी 20 फॉर्मेटमध्ये 25 जणांना त्याने माघारी पाठवलंय.
Team india senior off spinner Harbhajan Singh has announced his retirement from all formats International cricket