• Download App
    टाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती Tata rushed to the aid of the common man Daily supply of 200-300 tons of oxygen

    टाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती

    Tata rushed to the aid of the common man Daily supply of 200-300 tons of oxygen

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात सामान्य माणसांच्या मदतीला उद्योगपती रतन टाटा धावून आले असून त्यांनी रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. Tata rushed to the aid of the common man Daily supply of 200-300 tons of oxygen

    कोरोनाने पुन्हा देशात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाआहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यं केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत.



    या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मदतीसाठी टाटा स्टीलने धाव घेतली आहे.

    टाटा स्टीलच्या ट्विटमध्ये म्हटले, “कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू. ”

    Tata rushed to the aid of the common man Daily supply of 200-300 tons of oxygen


    महत्वाच्या बातम्या वाचा

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…