विशेष प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील खंडोबाची पाली देवस्थान मंदिरात तारळी नदीच्या पुराचे पाणी शिरले असून मंदिर पाण्याने भरलेले आहे. Tarali River oveflow; Flood water in the Temple of Khandobachi Pali Devasthan
मंदिरासह नदीकिनारी असलेली घरे देखील पाण्यात बुडाली आहेत. तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून संपूर्ण गावासह बाजारपेठेत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारळी नदीवरील पूल पाण्यात गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
पाली गावची लोकसंख्या ६ ते ७ हजार असून प्रशासनाच्या वतीने बोटीद्वारे बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.
- खंडोबाची पाली देवस्थान मंदिरामध्ये पुराचे पाणी
- नदीकिनारी असलेली घरे देखील पाण्यात बुडाली
- तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेला
- पूल पाण्यात गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
- पाली गावची लोकसंख्या ६ ते ७ हजार
- गावासह बाजारपेठेत पाणी साचले
- गावातील जनजीवन विस्कळीत
- प्रशासनाच्यावतीने बोटीद्वारे बचावकार्य सुरू