• Download App
    Tamil nadu Assembly Election 2021 Result

    Tamil nadu Assembly Election 2021 Result : द्रमुक जिंकणार की अद्रमुक ? तमिळनाडूत उत्सुकता शिगेला

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळनाडूमध्ये 234 विधानसभेच्या जागेसाठी आज मतमोजणी होत आहे. पश्चिम बंगालनंतर मतदार संघाच्या संख्येचा विचार केला तर तामिळनाडू हे मोठे राज्य आहे. Tamil nadu Assembly Election 2021 Result

    एआयएडीएमकेच्या (अद्रमुक) सर्वेसर्वा जयललिता उर्फ अम्मा आणि द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्या अनुपस्थित विधानसभेची निवडणूक होत आहे. जयललिता यांचे 2018 मध्ये निधन झाले होते. त्यांची उणीव खऱ्या अर्थाने एआयएडीएमकेला जाणवत आहे.



    अभिनेते-राजकारणी कमल हासन यांच्या मक्कल सुधी मैम यांच्यासह चार आघाड्यांची नोंद असली तरी मुख्य स्पर्धा एआयएडीएमके आणि मुख्य विरोधी पक्ष द्रमुक यांच्यात आहे.

    एआयएडीएमजकेची राज्यात सत्ता असून मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पन्नेरसेल्वम, विरोधी पक्ष नेते आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन, त्यांचा मुलगा आणि पक्षाचे युवा संघटनेचे सचिव उधयानिधी स्टालिन, एआयएडीएमकेचे प्रतिस्पर्धी आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम प्रमुख टीटीव्ही धिनकरण, एमएनएमचे कमला हसन आणि भाजपा यांच्यासह सुमारे 4000 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्य युनिटचे प्रमुख एल मुरुगन हे प्रमुख उमेदवार आहेत..

    कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसचे विजय वासंथ आणि भाजपचे पोन राधाकृष्णन हे प्रमुख उमेदवार आहेत

    Tamil nadu Assembly Election 2021 Result

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!