बेजबाबदारपणे बोलून परकीय देशांसोबतचे संबंध खराब करू नयेत, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे. Talking about foreign countries should not spoil relations, Foreign Minister S. Jaishankar also slammed Arvind Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बेजबाबदारपणे बोलून परकीय देशांसोबतचे संबंध खराब करू नयेत, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापूरहून आला असून लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यावरून सिंगापूर सरकारने केजरीवाल यांना फटकारले होते.
यासंदर्भात जयशंकर म्हणाले, भारत आणि सिंगापूर हे कोरोनाविरुध्दची लढाई एकत्रितपणे लढत आहेत. सिंगापूरने भारताला मदतही केली आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भारताला पाठविले आहेत. भारतीय लष्करी विमानांना मदत घेऊन येण्यासाठी आपले तळही उपलब्ध करून दिले आहेत. अशा परिस्थितीत बेजबाबदारपणाची वक्तव्ये दोन देशांमधील संबंध खराब करू शकतात. ज्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा आहे तेच असे बेजबाबदारपणे बोलत आहेत. केजरीवाल बोलतात म्हणजे ती भारताची भूमिका आहे हे समजण्याचेही कारण नाही.
केजरीवाल यांनी नुकतीच केंद्राला विनंती केली होती की सिंगापूरची विमानसेवा तातडीने स्थगित करावी. कारण या ठिकाणाहून कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात येण्याची भीती आहे. हा नवा स्ट्रेन मुलांसाठी घातक ठरू शकतो. हाच नवा स्ट्रेन भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्यास कारणीभूत होऊ शकतो. त्याचबरोबर केंद्राने लवकरात लवकर मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी प्रयत्न करावेत.
याबाबत सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की केजरीवाल यांचे वक्तव्य बिनबुडाचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सिंगापूर व्हेरिएंट नावाचा कोणाताही स्ट्रेन नाही. सिंगापूरमध्ये गेल्या काही आठवड्यापासून सापडत असलेला स्ट्रेन हा मुळात भारतातून आला आहे.
Talking about foreign countries should not spoil relations, Foreign Minister S. Jaishankar also slammed Arvind Kejriwal
महत्त्वाच्या बातम्या
- नव्या व्हेरिएंटवरील केजरीवालांच्या ट्वीटने वादाचे मोहोळ, सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांसमोर नोंदवला आक्षेप
- Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना
- Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू
- आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात
- यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक