विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा – तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानात नागरिकांना आणि अफगाण सैनिकांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी केला आहे. सध्या अफगाणिस्तानात मानवाधिकार भंगाच्या घटना घडत असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. Taliban insurgency continues in Afghanistan
तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानची सत्ता आल्यापासून तालिबानी नेते शांततेचे आवाहन करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून अत्याचार सुरु असल्याचे मिशेल बॅशलेट यांनी सांगितले. तालिबानी राजवटीमध्ये अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अत्याचाराचे सत्र सुरु होण्याची भीती व्यक्त करताना बॅशलेट यांनी, आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवाधिकार भंगाच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही आवाहन केले आहे.
तालिबानच्या नेत्यांनी सुधारणावादी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्थानिक जनतेचाही त्यांच्यावर विश्वारस नसून अनेक जण देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर धाव घेत आहेत. विमानतळावर गोळीबार, चेंगराचेंगरी यामध्ये आतापर्यंत किमान ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सामान्य नागरिकांच्या मानवाधिकारांचा सर्रास भंग होत असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यरक आहे.
Taliban insurgency continues in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद