वृत्तसंस्था
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस घेतला असून सोशल मीडियावर फोटो शेअर करून लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. एप्रिल महिन्यात लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शनिवारी दुसरा डोस घेतला आहे. Taken by superhero Amitabh Bachchan Second dose of anti-corona vaccine
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ते म्हणाले, “दुसराही झाला.. कोव्हिड वाला.. क्रिकेटवाला नाही…सॉरी सॉरी हे खूपच वाईट होतं.” असं मजेशीर कॅप्शन देत त्यांनी काही हसण्याचे इमोजी दिले आहेत.
लसीचा पहिला डोस घेतलयावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “झालं. आज दुपारी मी लस घेतली. सर्व काही ठीक आहे.”
दरम्यान, कोरोनाकाळात कोणाला मदत केली नाही अशी टीका करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं होतं. एक ब्लॉग शेअर करून केलेल्या मदत कार्याची संपूर्ण यादीच मांडली आणि टीकाकारांची बोलती बंद केली.