• Download App
    T20 WORLD CUP INDvPAK: हायव्होल्टेज सामन्याआधी कॅप्टन विराटची पाकिस्तानबाबत मोठी प्रतिक्रिया ; म्हणाला... T20 WORLD CUP INDvPAK: Captain Virat's big reaction to Pakistan before high voltage match; Said ...

    T20 WORLD CUP INDvPAK: हायव्होल्टेज सामन्याआधी कॅप्टन विराटची पाकिस्तानबाबत मोठी प्रतिक्रिया ; म्हणाला…

    • टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    यूएई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या सामन्यासाठी भारतात उत्साहाचं वातावरण आहे. या महामुकाबल्याआधी टीम इंडियाचा (Team India Captain) कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तान क्रिकेट टीमबद्दल मोठं विधान केलं आहे. तसेच हार्दिक पंड्याबाबतही माहिती दिली आहे.T20 WORLD CUP INDvPAK: Captain Virat’s big reaction to Pakistan before high voltage match; Said …

    विराट काय म्हणाला?

    “पाकिस्तान उत्तम संघ आहे. पाकिस्तान नेहमीच मजबूत संघ राहिला आहे. आम्ही पाकिस्तानला गृहीत धरु शकत नाहीत. तसेच या सामन्यात आम्ही ज्या प्रकारे खेळू त्याच प्रकारे इतर संघाविरुद्ध खेळू. आमच्यासाठी रेकॉर्ड्स महत्त्वाचे नाहीत.तसेच टीम म्हणून आम्ही याकडे जास्त लक्ष देत नाहीत”, असं विराटने नमूद केलं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विराट बोलत होता.

    हार्दिकबाबत –

    विराटने या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान त्याने हार्दिक पंड्याबाबतही माहिती दिली. पंड्या दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ बॉलिंग करत नाहीये. “हार्दिक आधीपेक्षा जास्त दुखापतीतून सावरला आहे. हार्दिक आता फीट आहे. हार्दिक टीमसाठी प्रत्येक सामन्यात 2 ओव्हर टाकू शकतो. आम्ही त्याच्या बॉलिंगबाबत फार चिंता करत नाहीयेत”, असंही विराटने स्पष्ट केलं.

     

    T20 WORLD CUP INDvPAK: Captain Virat’s big reaction to Pakistan before high voltage match; Said …

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!