• Download App
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा Swabhimani Shetkari Sanghatana MLA Devendra Bhuyar sentenced to three months imprisonment

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार भुयार यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने २०१३ मधील एका प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. Swabhimani Shetkari Sanghatana MLA Devendra Bhuyar sentenced to three months imprisonment

    वरुड तहसील कार्यालयाच्या सभागृहात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशोगाथा तयार करत असताना वाद झाला होता. आमदार भुयार यांच्यासह काही लोकांनी सभागृहात येऊन घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

    तसेच माझा फोन का कट केला? असं म्हणत आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी देत माईक फेकून मारला. याबाबत उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी पोलीस स्थानकात २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तक्रार दाखल केली होती.
    या घटनेबाबत दिनांक १५ एप्रिल रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.



    या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती एस एस आडकर यांनी आमदार भुयार यांना कलम ३५३ अन्वये तीन महिने सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना कारावास तसंच कलम २९४ अन्वये दोन महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

    या निकालाबाबत भुयार म्हणाले, चळवळ मोडीत काढण्याचा शासकीय अधिकाºयांचा हा प्रयत्न आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. याबाबत वरिष्ठ न्यायालयात दाद मागू.

    Swabhimani Shetkari Sanghatana MLA Devendra Bhuyar sentenced to three months imprisonment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस