कोरोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोटछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वॅग स्टिक पॅकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालिका प्रशासनासह पोलिसांनी तातडीने धाड टाकली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Swab sticks packing in slums used for corona testing, action taken against contractor
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोटछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वॅग स्टिक पॅकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालिका प्रशासनासह पोलिसांनी तातडीने धाड टाकली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कोरोनाची अँटिजन किंवा आरपीटीसीआर टेस्ट केली जाते. यासाठी टेस्ट वापरल्या जाणाऱ्या टेस्ट कीटमध्ये एक स्वॅब स्टिक असते. कोरोना तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले कीटच वापरले जातात. टेस्टिंगसाठी लागणारा स्वॅब रुग्णाच्या स्वॅबमधून स्टिक द्वारे काढला जातो. या स्वॅब स्टिक घराघरातच पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील ज्ञानेश्वरनगरमध्ये उघडकीस आला आहे.
काही महिलांसह लहान मुलं देखील ही पॅकिंग करत होते. स्वॅब किट पॅकिंग करताना ना कुणी मास्क घातलं होत किंवा कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच उल्हासनगर पोलिसांनी ज्ञानेश्वरनगरमधील घरांमध्ये धाड टाकली. यावेळी घराघरात जाऊन तपासणी करत काही घरातून स्वॅब स्टिकचा साठा ताब्यात घेण्यात आला.
परिसरातील 10 ते 15 घरात या स्टिकची पॅकिंग केली जात होती. दिवसाला एका घरात पाच हजार स्टिक पॅकिंग केली जात होते. या नागरिकाना हे स्टिक पॅकिंगसाठी देणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Swab sticks packing in slums used for corona testing, action taken against contractor
महत्त्वाच्या बातम्या
- बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
- पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण नाहीच, राज्यभर मराठा मोर्चे काढण्याचा विनायक मेटे यांचा इशारा
- Daya Nayak Transferred : प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर स्कॉड मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक साईडलाईन,थेट गोंदियात बदली
- मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राचे खासदार घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटणार ; भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा निर्धार