वृत्तसंस्था
कोलकाता : ममता कोणाच्याच नाही. त्या फक्त स्वतःच्याच आहेत. मला १० वर्षांत हाच अनुभव आलाय, असा तडाखा तृणणूळ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते सुवेंदू अधिकारी यांनी लगावला आहे. suvendu adhikari takes on mamata banerjee after entering bjp
सुवेंदू अधिकारी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आहे. suvendu adhikari takes on mamata banerjee after entering bjp
सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाच्या व्यासपीठावरून ममता बॅनर्जींवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी ज्या नेत्यांनी मला त्रास दिला ते आता मला पाठीत खंजीर खुपसणारा माणूस अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जी या कोणाच्याच नाहीत. मी एक गोष्ट खात्रीने सांगतो.
२०२१ मध्ये त्यांचा अहंकार तुटेल. विधानसभेची निवडणूक तृणमूळ काँग्रेस जिंकणार नाही. पश्चिम बंगालच्या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीचे अधिकारी यांनी वर्णन केले.
अमित शाह म्हणाले, “आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे.
suvendu adhikari takes on mamata banerjee after entering bjp
निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही तुमच्या पक्षात एकट्याच राहाल. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना फोडते दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूळ काँग्रस काढली तेव्हा ते पक्षांतर नव्हते का?,” असा परखड सवाल शाह यांनी ममतांना केला.